मालाडमध्ये इमारत कोसळून 11 ठार 7 जखमी

malad
malad

मुंबई : मुंबईतल्या मालाड Malad परिसरात तीन मजली इमारत Building कोसळून Collapsed इमारतीत व शेजारील घरात राहणाऱ्या अकरा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींवर शेजारच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 11 killed, 7 injured in building collapse in Malad

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार काल पासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार आलेल्या पावसाने धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. अशातच  मालाडमध्ये रात्री अकराच्या सुमारास हि दुर्घटना घडल्याने मदतकार्य पोहचवण्यास देखील अडचणी निर्माण झाल्या होत्या.

मालाडच्या मालवणी Malvani भागातील असलेली ही इमारत जवळच्या घरांवर कोसळली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या संबंधी माहिती दिली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. जोरदार पाऊस व वारा यामुळे ही इमारत कोसळली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आत्तापर्यंत सात ते आठ जणांना वाचवण्यात यश आले असून  अग्निशमन दल,पोलीस,महापालिका कर्मचारी यांच्या माध्यमातून हे बचावकार्य अद्यापही सुरूच आहे.

दुर्घटना घडलेला हा परिसर दाट इमारतींचा व झोपडपट्टीचा आहे. सदर परिसरात अरुंद रस्ता असल्याने रूग्णवाहिका, अग्निशमन दल व महापालिकेच्या वाहनांना घटनास्थळापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या.

मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत घटनास्थळी पोहचून बचावकार्य सुरु केले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली आहे. बचावकार्यासाठी अग्निशमन दलाचे जवान पोहचण्यापूर्वी या घटनेतील नागरिकांना स्थानिकांनी प्रयत्न्न करून वाचवले आहे. मात्र अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असावेत अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com