राज्यात २४ तासांत १२३३ नवे रुग्ण

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 7 मे 2020

राज्यातील करोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा आता १६ हजार ७५८ इतका झाला आहे. महाराष्ट्रात करोनाची दहशत आणखी वाढली आहे. राज्यात आज करोनामुळे ३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या आता ६५१ वर पोहचली आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यात आज एकाच दिवशी करोनाचे १२३३ नवीन रुग्ण आढळले असून आतापर्यंत २४ तासांतील रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे.

मुंबई: राज्यातील करोना साथीचा आजचा तपशील धोक्याची घंटा वाजवणारा आहे. आज राज्यात एकाच दिवशी करोनाचे १२३३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. मात्र, त्याला अपेक्षित यश अद्याप मिळालेले नाही. करोना साथीने मुंबई, पुणे या महानगरांत तर थैमान घातले आहे. या शहरांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच चिंतेने ग्रासले आहे. 

 राज्यातील करोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा आता १६ हजार ७५८ इतका झाला आहे. महाराष्ट्रात करोनाची दहशत आणखी वाढली आहे. राज्यात आज करोनामुळे ३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या आता ६५१ वर पोहचली आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यात आज एकाच दिवशी करोनाचे १२३३ नवीन रुग्ण आढळले असून आतापर्यंत २४ तासांतील रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ९० हजार ८७९ नमुन्यांपैकी १ लाख ७३ हजार ८३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १६ हजार ७५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.  

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १०४८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ११ हजार ६९२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५१.१४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे
 

आज राज्यात ३४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील २५, पुण्यातील ३, अकोला शहरात ३, जळगाव शहरात १ तर सोलापूर शहरात एका रुग्णांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर १३ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील १८ रुग्ण आहेत तर १३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहेत. ३४ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. राज्यात २ लाख ११ हजार ११२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १३ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

 

WebTittle ::  1233 new patients in 24 hours in the state


संबंधित बातम्या

Saam TV Live