Video | तब्बल 24 तास लावणी सादर करुन 14 वर्षीय सृष्टी करणार नवा विक्रम

साम टीव्ही
बुधवार, 27 जानेवारी 2021

लातूरमध्ये नववीत शिकणाऱ्या सृष्टी जगतापनं २४ तास सलग लावणी नृत्य करण्याचा निश्चय केलाय. लातूरच्या दयानंद सभागृहात काल दुपारी साडेचार वाजता तिनं नृत्याला सुरुवात केलीय. आज दुपारी साडेचार वाजेपर्यंत सृष्टी लावणी सादर करत राहणारय.

लातूरमध्ये नववीत शिकणाऱ्या सृष्टी जगतापनं २४ तास सलग लावणी नृत्य करण्याचा निश्चय केलाय. लातूरच्या दयानंद सभागृहात काल दुपारी साडेचार वाजता तिनं नृत्याला सुरुवात केलीय. आज दुपारी साडेचार वाजेपर्यंत सृष्टी लावणी सादर करत राहणारय.

 तिच्या या अनोख्या विक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. या विक्रमासाठी आई-वडील आणि आजोबांनी तिला सहाय्य केलं असून तासनतास सृष्टीची तयारी सुरु होती. हैद्राबादचं एक पथकंही तिच्या या विक्रमाची नोंद घेतंय. लातूर तालुक्यातल्या गंगापूर इथल्या 14 वर्षीय सृष्टीला लहानपणापासून नृत्याची आवड आहे.

सृष्टी सुधीर जगताप ही पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे नववीच्या वर्गात शिकत आहे. तिने अनेक कलाप्रकारात आपले प्रावीण्य दाखवले आहे. तिने किल्लारी फेस्टिवल, लातूर फेस्टिव्हल, अष्टविनायक अशा नामांकित राज्य व देशपातळीवरील नृत्य व अभिनय स्पर्धेत तिने 71 पुरस्कार मिळवले आहेत. `ती फुलराणी`, `मी जिजाऊ बोलते`, `मी सावित्रीबाई फुले बोलते`, `मुलगी वाचवा मुलगी शिकवा` असे एकपात्री प्रयोग करून तिने समाज प्रबोधन केले आहे.

अंगावर शहारे आणणारे पोवाडा गायन करते. अशी हरहुन्नरी बालकलाकार येत्या २६ जानेवारीला दुपारी दोन वाजल्यापासून 27 जानेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत लावणी नृत्य सादर करून आपले आशिया बुक रेकॉर्ड स्थापित करणार आहे. हा कार्यक्रम दयानंद सभागृहात येथे होणार आहे. याच कार्यक्रमात `एक टप्पा आउट`चे सुपरस्टार बालाजी सूळ चौफेर कॉमेडी करणार आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी भेट देऊन चिमुकल्या सृष्टीला प्रोत्साहन देऊन मनोबल वाढवावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live