1401 कोटींची कर्जमाफी, सव्वादोन लाख खात्यांवर रक्कम वर्ग

1401 कोटींची कर्जमाफी, सव्वादोन लाख खात्यांवर रक्कम वर्ग

नगर: कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील दोन लाख 28 हजार 521 कर्जखात्यांवर 1401 कोटी 92 लाख 67 हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यांत सर्व जिल्हा सहकारी बॅंकेच्या थकबाकीदारांचा समावेश आहे. कर्जखात्यांवर रकमा जमा होऊ लागल्याने शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील 1598 गावांतील दोन लाख 38 हजार 233 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे सुरू आहे. 
बळिराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. त्यात शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होत आहे. शासननिर्णय लागू झाल्यापासून जिल्हा प्रशासनाने योजनेच्या अंमलबजावणीत आघाडी घेतली आहे. जिल्हा बॅंकेच्या शाखा व "आपले सरकार' सेवा केंद्रातील दोन हजार बायोमेट्रिक मशिनद्वारे आधार प्रमाणीकरणाचे काम निरंतर सुरू आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली शासननिर्देशानुसार कर्जमुक्तीची अंमलबजावणी काटेकोरपणे होत आहे. पात्र शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. आधार क्रमांक व रकमेविषयीच्या तक्रारींचे निराकरण तहसील व जिल्हास्तरीय समितीकडून करण्यात येत आहे. 

Webtitle: 1401 Crore Loan waiver amount in farmers account

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com