२४ तासांमध्ये १,४९८ भारतीयांची 'घरवापसी'

साम टीव्ही न्यूज
रविवार, 10 मे 2020

लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून शनिवारी ३२८ प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान पहाटे ४ वाजता मुंबईत पोहोचले. मायदेशात सुखरूप पोहोचल्याचा आनंद या प्रवाशांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. काही प्रवासी भावुक देखील झाले होते. वंदे भारत अभियानांतर्गत परदेशातील भारतीय नागरिक एअर इंडियाच्या विमानाने परतू लागले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १,४९८ हून अधिक भारतीयांची 'घरवापसी' झाली आहे.

 

नवी दिल्ली: परदेशात अडकलेलेा भारतींना गेल्या ३०-४० दिवसांपासून भारतात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. एअर इंडिया ७ मे ते १३ मे पर्यंत १२ देशांमधील १५ हजार भारतीयांना परत आणणार आहे. १५ मे नंतर या अभियानाचा दुसरा टप्पाही सुरू होणार आहे. 

लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून शनिवारी ३२८ प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान पहाटे ४ वाजता मुंबईत पोहोचले. मायदेशात सुखरूप पोहोचल्याचा आनंद या प्रवाशांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. काही प्रवासी भावुक देखील झाले होते. वंदे भारत अभियानांतर्गत परदेशातील भारतीय नागरिक एअर इंडियाच्या विमानाने परतू लागले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १,४९८ हून अधिक भारतीयांची 'घरवापसी' झाली आहे. तर, मालदीवमधून आतापर्यंत ६९८ लोकांना घेऊ आएएनएस जलाश्व कोच्चीला पोहोचले आहे.

विमानतळावरील प्राथमिक तपासणीनंतर या प्रवाशांना बसद्वारे वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. नियमानुसार आता सर्व प्रवाशांना क्वारंटीन केले जात आहे. लंडनहून परतलेले सर्व प्रवासी हे काही दिवसांसाठी लंडनला गेले होते. मात्र, लॉकडाउनमुळे ते लंडनमध्ये अडकले होते.या बरोबरच, शारजाह येथून १८२ प्रवासी विमानाने लखनऊला पोहोचले. विमानतळावर सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली. लखनऊबाहेरील प्रवाशांना टॅक्सी आणि बसद्वारे त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यात पाठवण्यात येत आहे. जे लखनऊचे आहेत, अशांना पुढील तीन दिवसांमध्ये हॉटेलांमध्ये क्वारंटीन ठेवण्यात येणार आहे. 

मलेशियामध्ये अडकलले १७७ भारतीय शनिवारी रात्री त्रिची आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. या प्रवाशांमध्ये मलेशियात अडकलेले भारतीय आणि इतर नागरिक आणि खाजगी कंपन्यांचे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रवाशांना भारत अभियानांतर्गत आणण्यात आले. एअर इंडियाचे हे विमान शनिवारी रात्री १०.२० वाजता त्रिचीला पोहोचले. विमानतळावर प्रवाशांची तपासणी करण्यात आली. ज्या प्रवाशांना कोरोना लक्षणे आढळली, अशांना महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, इतरांना क्लारंटीन केले गेले. कुवेतहून विशेष विमानाने एकून १६३ प्रवाशी हैदराबागदला दाखल झाले आहेत. त्यानंतर रात्री उशिरा कोच्ची विमानतळावर आणखी काही प्रवासी उतरले. शनिवारी ढाका येथून आलेले पहिले विमान दिल्ली विमानतळावर दाखल झाले. या विमानातून आलेल्या सर्व १२९ प्रवाशांना क्वारंटीन करण्यात आले. तसेच मस्कत आणि ओमानमधूनही भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान केरळमध्ये रात्री दाखल झाले.

 

webTittle :: 1,498 Indians 'repatriated' in 24 hours


संबंधित बातम्या

Saam TV Live