नागरिकांच्या खात्यावर 15 लाखही जमा होणार...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

सांगली- निवडणुकीपूर्वी सरकारने केलेल्या घोषणांपैकी काही घोषणा पूर्ण झाल्या आहेत. पण राहिलेल्या घोषणाही लवकरच पूर्ण होतील. त्यामध्ये नागरिकांच्या खात्यावर 15 लाखही जमा होणार आहेत. मात्र आम्हाला काही तांत्रिक अडचणीमुळे रिझर्व्ह बँकच पैसे देत नसल्याचे केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेशी बोलणे चालू आहे. लवकरच पैसे जमा होतील असे त्यांनी सांगितले. ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पंतप्रधान हे मंत्र्याना वेळ देतात, ते आमचे सर्व ऐकतात, ते मंत्र्याचे ऐकत नाहीत असे काही नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांना कोणता मुद्दा राहिला नाही, त्यामुळे ते असे बोलत आहेत असेही आठवलेंनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, ईव्हीएम मशिनला जर विरोध असेल तर निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. मात्र, या निवडणुकीत माशिनद्वारे निवडणुका होतील.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ता स्थापन केली परंतु, येत्या निवडणुकीत आम्हीच सत्तेत येऊ आणि राहिलेल्या तीन ते चार महिन्यात काँग्रेसची हवा काढून पुन्हा देशांत नरेंद्र मोदींची सत्ता आणू असे आठवलेंनी स्पष्ट केले. पाच राज्याच्या निवडणुकीवरून भाजप आणि आमचे चिंतन सुरू असून आगामी निवडणुकीसाठी भाजप-सेनेने एकत्र आले पाहिजे. तसेच माझी नेहमीच मध्यस्थाची भूमिका असते त्यामुळे सर्व घटक पक्षांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, येणाऱ्या निवडणुकीत आरपीआयला लोकसभेला दोन जागा मिळाव्यात म्हणून आग्रही राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: 15 lakh will be deposited on the account says Athavale

संबंधित बातम्या

Saam TV Live