1.5 लाख परप्रांतीय मजूर पुन्हा महाराष्ट्रात परतले, अर्थचक्राला पुन्हा गती येणार...

साम टीव्ही
मंगळवार, 16 जून 2020

राज्याच्या मंदावलेल्या अर्थचक्राला गती देणारी एक बातमी समोर येतेय. परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने राज्यात परततायत. गेल्या १५ दिवसांत तब्बल दीड लाख मजूर महाराष्ट्रात परतलेत. लॉकडाऊननंतर परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात त्यांच्या राज्यात गेले.

राज्याच्या मंदावलेल्या अर्थचक्राला गती देणारी एक बातमी समोर येतेय. परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने राज्यात परततायत. गेल्या १५ दिवसांत तब्बल दीड लाख मजूर महाराष्ट्रात परतलेत. लॉकडाऊननंतर परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात त्यांच्या राज्यात गेले. तब्बल ८४४ रेल्वेगाड्यांद्वारे हे १२ लाख ५ हजार मजूर स्वगृही परतलेत. मुंबई, ठाणे, नाशिक, आणि पुण्यासह राज्यातील उद्योग पुन्हा सुरू करायचे तर मजुरांची वानवा भासणार होती.

सुरुवातीला परराज्यांमधून अत्यंत कमी मजूर येत होते, पण गेल्या काही दिवसात यात लक्षणीय वाढ होतेय. मुंबई, ठाणे आणि पालघर इथे २७९ रेल्वे गाड्यांमधून एक लाख मजुरांची वापसी झाली. बुलडाणा, नंदुरबार, गोंदिया, रायगड, सातारा, सोलापूर, नागपूर, पुणे या शहरांमिळून जवळपास चार हजार मजूर रोज परतत आहेत. गेल्या तेरा दिवसांत जवळपास ५० हजार मजूर राज्यात परतले आहेत.

दरम्यान, कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढतच चाललंय. कोरोनाशी दोन हात करणाऱ्या तीन पोलिसांचा गेल्या चोवीस तासांत मृत्यू झालाय. त्यामुळं मुंबई पोलिस दलातील करोनाने निधन झालेल्यांची संख्या ३०वर पोहोचली. तर, मुंबई पोलिस दलातील एका आयपीएस अधिकाऱ्यालाही करोनाची लागण झाली. सर्व मृत पोलिस कर्मचारी अंधेरी पोलिस ठाणे, निर्मल नगर पोलीस ठाण्ये, जोगेश्वरी पोलिस ठाणे येथील पोलिस ठाण्यात कार्यरत होते. आतापर्यंत मुंबई पोलिस दलातील सुमारे दोन हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झालीय. तर राज्यातील मृत पोलिसांचा आकडा बेचाळीसवर गेलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live