अर्थसंकल्पातील या 15 घोषणा तुमच्या जगण्यावर परिणाम करणार

ajit pawar budget 2020
ajit pawar budget 2020

 मुंबई - अजित पवारांनी ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी प्रत्येक मुद्द्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेती, शिक्षण, वाहतूक, उद्योग आणि आरोग्यासह पर्यटनाबाबत अजित पवारांनी अनेक घोषणा केल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या टॉप पंधरा घोषणा थेट तुमच्या आमच्या जगण्यावर परिणाम करणार आहेत.

कोणत्या आहेत या 15 घोषणा?


1 पेट्रोल डिझेल महागलं

पेट्रोल-डिझेलवर 1 रुपयांचा अतिरीक्त कर लावण्यात येणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगचं कारण देत हा कर लादण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. लोकांनी कमी गाड्या वापराव्यात यासाठी पेट्रोल डिझेलची दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे भाज्यांसोबतच प्रवास महागण्याची दाट शक्यताय. 

2 कर्जमाफीसाठी 22 हजार कोटी

शेतकरी कर्जमाफीसाठी 22 हजार कोटी तरतूद करण्यात आली आहे. 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांनाही या अर्थसंकल्पातून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केला जाणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. 

3 नोकरीत 80% आरक्षण

भूमीपुत्रांना नोकरीत 80% आरक्षणासाठी कायदा करण्यात येणारे. आंध्रच्या धर्तीवर महाराष्ट्रातही भूमीपुत्रांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी सरकार विशेष खबरदारी घेण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात येणार आहे. 

4 मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम राबवणारला जाणार. 

5 मेडिकल कॉलेजच्या जागा वाढवल्या जाणार आहेत. तसंच मेडिकल कॉलेजही नव्याने उभारण्यात येणार आहेत. 

6 प्रत्येक ग्रामपंचायतीचं स्वतंत्र कार्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. 

7 येत्या 4 वर्षात पुण्यात रिंगरोड प्रस्तावित असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. 

8 जुन्या ST बदलून 1 हजार 600 नव्या बस आणल्या जाणार आहेत.

9 समुद्री वाहतुकीसाठी नव्या जेट्टी उभारण्यात येणार आहेत. समुद्री वाहतुकीला चालना देण्यासाठी यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. 

10 साताऱ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची वसाहत उभारणार

11 शेतकऱ्यांना सौरपंप

शेतकऱ्यांना सौरपंप देण्यात येणार आहेत. वर्षाला 1 लाख सौरपंपांचं वाटप सरकारकडून करण्यात येणार. 5 वर्षा 5 लाख सौरपंपांचं वाटप करण्याचं सरकारचं टार्गेट आहे. 

12 प्रत्येक जिल्ह्यात 1 महिला पोलिस ठाणे उभारलं जाणार आहे. या पोलिस ठाण्यात सर्व महिलाच कर्मचारी असतील. 

13 मराठीच्या प्रसारासाठी मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. मुंबईत हे भवन उभारलं जाणार आहे. 

14 पर्यटनासाठी तब्बल 1 हजार कोटी

वरळी, हाजी अली पर्यटन विकासासाठी विशेष तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पर्यटनासाठी तब्बल 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी तरतूद मानली जाते आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या खात्याला पहिल्यांदाच 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलंय. 

15 आमदारांच्या निधीमध्ये 1 कोटी रुपयांची वाढ

आमदारांच्या निधीमध्ये 1 कोटी रुपयांची वाढकरण्यात आली आहे. त्यामुळे आता आमदार निधी 2 वरुन 3 कोटी रुपये झालाय. विशेष म्हणजे हा शासकीय निधी खासगी बँकेत ठेवता येणार नाही आहे. तशा सूचना मुख्य सचिवांना देण्यात आल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. 

मोठी बातमी- पाहा व्हिडीओ

2020 budget mumbai shivsena uddhav ajit pawar cm aghadi politics economy people bjp ncp congress mahavikas aghadi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com