भंडाऱ्याच्या पोहरा गावात कुत्र्याची दहशत; तब्बल 15 लोकांना केले जखमी

अभिजीत घोरमारे
सोमवार, 24 मे 2021

भंडारा जिल्हात चक्क एका पिसाळलेल्या कुत्र्यानेच दहशत निर्माण केली आहे. लाखनी तालुक्यातील पोहरा गावात ह्या पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 15 लोकांचा चावा घेत त्यांना गंभीर जखमी केले आहे.

भंडारा : बापरे ! भंडारा Bhndara जिल्हात चक्क एका पिसाळलेल्या कुत्र्याने Stray dog दहशत निर्माण केली आहे. लाखनी Lakhani तालुक्यातील पोहरा Pohara गावात ह्या पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 15 लोकांचा चावा घेत त्यांना गंभीर जखमी केले आहे. 15 people were bitten by a stray dog in Pohara village

हे  देखील पहा -

यात चावा घेऊन गंभीर जखमी केल्लेल्यांमध्ये 60 वर्षीय वृद्धापासून ते 3 वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे. अतिगंभीर जखमी व्यक्ती रतिराम गायधने (वय 60) यांचा भंडारा सामान्य रुग्णालयात Hospital उपचार सुरु आहेत. तर इतर 14 लोकांचा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहरा येथे उपचार करून आता त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. 

कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झालेल्या दोन पशुवैद्यकिय डॉक्टरांचा दुदैवी मृत्यु

विशेष म्हणजे यात यशु दीपक कांबळे (वय 3) वर्षाच्या मुलाच्या पोटाला कुत्र्याने चावा घेतला आहे. त्याला ही प्रथमोपचार First aid करून घरी पाठविन्यात आले आहे. त्यामुळे पोहरा गाव सद्य कुत्र्याच्या दहशतीत असून ह्या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांकडून जोर धरत आहे. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live