महाराष्ट्रात कोरोना रुग्ण 15 हजारांच्या पार, वाचा तुमच्या जिल्ह्याची परिस्यिती

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण 15 हजारांच्या पार, वाचा तुमच्या जिल्ह्याची परिस्यिती

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या  १५ हजार ५२५ झाली आहे. आज  ८४१ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३५४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २८१९ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

पाहा सविस्तर व्हिडीओ-

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८२ हजार ८८४ नमुन्यांपैकी १ लाख ६७ हजार २०५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १५ हजार ५२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ९९ हजार १८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२ हजार ४५६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  आज राज्यात ३४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २६, पुण्यातील ६, औरंगाबाद शहरात १ तर कोल्हापूरमध्ये १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २४ पुरुष तर १० महिला आहेत. 

आज झालेल्या ३४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४  रुग्ण आहेत तर १६  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ३४ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये ( ८२ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी) 
मुंबई महानगरपालिका: ९९४५ (३८७)
ठाणे: ८२ (२) 
ठाणे मनपा: ४६६ (८)
नवी मुंबई मनपा: ४१५ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २२७ (३)
उल्हासनगर मनपा: १२ 
भिवंडी निजामपूर मनपा: २० (२)
मीरा भाईंदर मनपा: १८२ (२) 
पालघर: ३१ (१) 
वसई विरार मनपा: १६१ (४)
रायगड: ५६ (१) 
पनवेल मनपा: १०७ (२)
ठाणे मंडळ एकूण: ११,७०४ (४१६) 
नाशिक: २१
नाशिक मनपा: २७
मालेगाव मनपा:  ३६१ (१२)
अहमदनगर: ४४ (२)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ४७ (११)
जळगाव मनपा: ११ (१)
नंदूरबार: १९ (१) 
नाशिक मंडळ एकूण: ५७१ (३०)
पुणे: १०३ (४)
पुणे मनपा: १८३६ (११२)
पिंपरी चिंचवड मनपा: १२३ (३)
सोलापूर: ३ (१)
सोलापूर मनपा: १२७ (६)
सातारा: ७९ (२)
पुणे मंडळ एकूण: २२७१ (१२८)
कोल्हापूर: ९ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
सिंधुदुर्ग: ३ (१)
रत्नागिरी: १० (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ६२ (४)
औरंगाबाद:३
औरंगाबाद मनपा: ३३७ (११)
जालना: ८
हिंगोली: ५५
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ४०५ (१२)
लातूर: १९ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३ 
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २८ (२)
लातूर मंडळ एकूण: ५४ (३)
अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ५६ (५)
अमरावती: २ (१)
अमरावती मनपा: ५९ (९)
यवतमाळ: ९२
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: २४१ (१७)
नागपूर: २
नागपूर मनपा: १७९ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १८७ (२)
इतर राज्ये: ३० (५)
एकूण:  १५ हजार ५२५ (६१७)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com