मरकजला गेल्याची माहिती लपवणाऱ्या 150 जणांवर गुन्हा दाखल

साम टीव्ही
मंगळवार, 7 एप्रिल 2020

तबलीगी मरकज मेळाव्याला गेल्याची माहिती लपवल्याप्रकरणी मुंबईतील तब्लिगी समाजातील 150 जणांवर पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दिल्लीतील तबलीगी मरकज मेळाव्याला गेल्याची माहिती लपवल्याप्रकरणी मुंबईतील तब्लिगी समाजातील 150 जणांवर पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय. जाणीवपूर्वक माहिती लपवल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिल्लीतल्या या तब्लिगींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांनी माहिती न लपवता समोर यावं. तसंच महापालिका हेल्पलाईनवर त्याबाबतची माहिती द्यावी अन्यथा वेगवेगळ्या कलमांतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला होता. त्यानंतर आता कारवाईला सुरूवात झालीय.

दिल्लीच्या निजामुद्दीम भागात 15 ते 17 मार्च दरम्यान एक कार्यक्रम झाला. त्यात अनेक लोक सहभागी झाले होते. देशात कोरोनाच्या केसेस वाढत असतानाच अनेक लोकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. 

हे लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून आले होते आणि ते परत आपापल्या भागात गेले. त्यापैकी 1,830 जणांची ओळख पटली आहे, असं दिल्लीचे उप-मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितलं आहे. गर्दी करण्यास मनाई केलेली असतानाही हे लोक तिथे जमले.  नि त्यांच्यामुळे भारतात कोरोनाचा फैलाव झाला. यामुळे भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढलाय. तब्बल 3 हजारांच्या वर हा आकडा पोहचलाय. तर यात 40 टक्के तबलिगी समाजाच्या मार्कजमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. 

दरम्यान, तब्लिगी समाजातील 150 जणांवर पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय. जाणीवपूर्वक माहिती लपवल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

Web Title - 150 people have been charged with hiding information that went to Merkaj


संबंधित बातम्या

Saam TV Live