माझगाव डॉकमधील १५०० कामगारांचा कंत्राटी रोजगार संकटात 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

 

 

मुंबई: माझगाव डॉकने आजवर ४० हून अधिक युद्धनौका व पाणबुड्या तयार केल्या आहेत. पण या सर्व नौकांचे पहिला स्क्रू लावण्यापासून ते अखेरीस ती नौका नौदलाकडे सुपूर्द करण्याचे प्रत्येक काम माझगाव डॉकमध्येच झाले आहे. आता अचानक हे महत्त्वाचे काम बाहेरील कंपनीला देण्यात आल्याने १५०० कामगारांचा कंत्राटी रोजगारही संकटात आला आहे. नौकेच्या जुळवणीचे काम करण्यात कुशल असलेल्या या १५०० कर्मचाऱ्यांचा करार जानेवारीत संपणार आहे. पण अशाप्रकारे कंपनी व्यवस्थापन हे काम परस्पर बाहेर देत असल्यास त्यांच्या हाती कामच उरणार नाही. त्यामुळे त्यांना जानेवारीनंतर नोकरी गमवावी लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीने विनाशिका श्रेणीतील युद्धनौकेची जुळवणी गुजरातमधील एका खासगी कंपनीकडे परस्पर सोपवली आहे. त्यामुळे माझगाव डॉकमधील १५०० कुशल कंत्राटी कामगारांचा रोजगार संकटात आला आहे.
एमडीएलमध्ये नौका बांधणीचे एकूण तीन प्लॅटफॉर्म अर्थात स्लिप वे आहेत. दोनवर फ्रिगेट श्रेणीतील नौकेची बांधणी सुरू आहे. एका स्लिप वेवर या नौकेची टप्प्याटप्प्यात बांधणी करण्यात आली. यानंतर आता येथेच नौकेची जुळवणीही होणे अपेक्षित होते. पण कंपनीने जुळवणीचे काम अचानक भरुच येथील शाफ्ट ऑफशोअर या कंपनीला दिले. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा या विनाशिकेची बांधणी माझगाव डॉकमध्ये झाली आणि त्याची महत्त्वाची जुळवणी मात्र गुजरातमधील खासगी कंपनी करणार आहे.

WebTittle : 1500 workers contract labor crisis in Mazgaon Dock


संबंधित बातम्या

Saam TV Live