आता रेल्वे स्थानकांवर होणार ५० रुपयांत १६ चाचण्या

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

नवी दिल्ली - देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर आता ५० रुपयांत १६ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवासी व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आरोग्य रक्षणासाठी हा नवा प्रयोग लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. केवळ दहा मिनिटांत चाचणीचा अहवाल देणाऱ्या या वैद्यकीय चाचण्यांसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना नाममात्र दहा रुपये द्यावे लागतील.

नवी दिल्ली व हजरत निजामुद्दीनसह काही स्थानकांवर सध्या मोठमोठी हेल्थ चेकअप यंत्रे बसविण्यात येत आहेत. नव्या योजनेत संबंधितांना रक्ताचे नमुने द्यावे लागणार नाहीत. मात्र यात हृदयाचे ठोके, नाडीपरीक्षण व अन्य १६ प्रकारच्या चाचण्या करून मिळतील. डॉक्‍टरांच्या उपलब्धतेनुसार लवकरच यात मधुमेहादी चाचण्यांचाही समावेश केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: 16 test on railway station in 50 rupees

संबंधित बातम्या

Saam TV Live