2-1 ने सामना जिंकत इंग्लंडची ट्युनिशियाला मात

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 जून 2018

फुटबॉल विश्वचषकाचे सामने उत्तरोत्तर रंगत जात आहेत.  जी गटातला ट्युनिशिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना इंग्लंडने जिंकला आहे. इंग्लंडने २-१ असा सामना जिंकत ट्युनिशियाला मात दिली. इंग्लंडसाठी दोन्ही गोल कर्णधार हॅरी केन याने केले. त्यामुळे  हॅरी केन या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. सामन्याच्या पहिल्या दहा मिनिटांतच इंग्लंडने रोमहर्षक पद्धतीने हॅरी केनने पहिला गोल नोंदवत आघाडी घेतली. अटीतटीच्या या सामन्यातल्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये गोल करण्यात इंग्लंड यशस्वी झाला. या विजयामुळे जी गटात इंग्लंड आणि बेल्जियम पहिल्या स्थानावर आहेत.

फुटबॉल विश्वचषकाचे सामने उत्तरोत्तर रंगत जात आहेत.  जी गटातला ट्युनिशिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना इंग्लंडने जिंकला आहे. इंग्लंडने २-१ असा सामना जिंकत ट्युनिशियाला मात दिली. इंग्लंडसाठी दोन्ही गोल कर्णधार हॅरी केन याने केले. त्यामुळे  हॅरी केन या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. सामन्याच्या पहिल्या दहा मिनिटांतच इंग्लंडने रोमहर्षक पद्धतीने हॅरी केनने पहिला गोल नोंदवत आघाडी घेतली. अटीतटीच्या या सामन्यातल्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये गोल करण्यात इंग्लंड यशस्वी झाला. या विजयामुळे जी गटात इंग्लंड आणि बेल्जियम पहिल्या स्थानावर आहेत. बेल्जियमने पनामाचा 3-0 असा पराभव केला होता. 


संबंधित बातम्या

Saam TV Live