आरवडेत शेततळ्यात पडून 2 बालकांचा मृत्यू

विजय पाटील
गुरुवार, 10 जून 2021

पाण्यामध्ये घसरून पडल्याचा अंदाज व्यक्त करत तरुणांनी पाण्यात उड्या टाकल्या असता शेततळ्याच्या तळभागात दोघे सापडले.

सांगलीच्या तासगाव तालुक्यातील आरवडे येथे घराच्या मागे असणाऱ्या शेततळ्यात पडून शौर्य संजय मस्के वय-6 वर्षे राहणार आरवडे आणि ऐश्वर्या आप्पासो आवटी वय-8 वर्षे राहणार माधवनगर या दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. (2 children die after falling in pond )

आरवडे-गोटेवाडी रोडलगत असणाऱ्या मस्के वस्ती येथे आपल्या घराबाहेर शौर्य व ऐश्वर्या नेहमीप्रमाणे खेळत होते. सायंकाळी दोघेही दिसेनात म्हणून कुटुंबीयांनी आसपासच्या घरामध्ये शोधायला सुरवात केली मात्र ते दोघे सापडले नाहीत. त्यानंतर घरामागे असणाऱ्या शेततळ्याकडे शोधायला गेले असता शेततळ्यावर मोबाईल दिसला.

हे देखील पाहा

पाण्यामध्ये घसरून पडल्याचा अंदाज व्यक्त करत तरुणांनी पाण्यात उड्या टाकल्या असता शेततळ्याच्या तळभागात दोघे सापडले. तात्काळ त्यांना पाण्याबाहेर काढून तासगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यापैकी ऐश्वर्या ही माधवनगर येथील नातेवाईकांच्या घरातून आरवडे येथे काही दिवसांपूर्वी आली होती. घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणार होता. शौर्य हा आईवडिलांना एकुलता एक होता तर ऐश्वर्या हिला 2 लहान भाऊ आहेत.

Edited By: Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live