तुमची 2000 ची नोट बोगस? कोट्यवधींच्या बनावट नोटा जप्त

साम टीव्ही
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020
 • तुमची 2000 ची नोट बोगस?
 • 2 हजाराच्या बनावट नोटा बाजारात
 • कोट्यवधींच्या बनावट नोटा जप्त
   

तुमच्याकडे 2 हजाराची नोट असेल तर आधी ती तपासून पाहा. ती नोट बोगस तर नाही ना? हुबेहुब 2 हजाराच्या नोटेसारखीच दिसणाऱ्या नोटा चलनात आल्यायत. तुम्हाला त्या नोटेवर संशयही येणार नाही की ती बोगस आहे. अशाच कोट्यवधींच्या बोगस नोटा बाजारात आल्यायत. त्यातली एखादी नोट तुमच्याकडेही असू शकते एवढ्या बोगस नोटा चलनात आल्याचं समोर आलंय. 

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून, देशात जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये सर्वाधिक संख्या 2000 रुपयांच्या नोटांची आहे. त्यामुळे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतायत. पण, आतापर्यंत किती बोगस नोटा जप्त केल्यायत वाचा-

 • 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये सर्वाधिक बोगस नोटा जप्त करण्यात आल्या
 • 2019 मध्ये देशात एकूण 25.39 कोटी रुपयांचे बनावट भारतीय चलन जप्त केलं
 • 2018 मध्ये हा आकडा केवळ 17.95 कोटी होता
 • 2019 मध्ये 2 हजारांच्या एकूण 90,566 बनावट नोटा जप्त केल्या 
   

यातील बहुतेक नोटा कर्नाटक, गुजरात आणि पश्चिम बंगालमधून जप्त करण्यात आल्या होत्या. दरम्यान, केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशात हजार आणि पाचशेच्या नोटा बंद केल्या. ही नोटाबंदी देशातील काळा पैसा आणि बनावट नोटा चलनातून थांबविण्यासाठी केली होती. पण, झालं उलटंच आणि आधीपेक्षा आता बनावट नोटा चलनात आल्याचं समोर आलंय.

2019-20 च्या आर्थिक वर्षात 2 हजाराच्या नवीन नोटा छापल्या नाहीत. देशातही 2 हजारांच्या नोटांचं प्रमाणही कमी आहे. तरीदेखील मोठ्या संख्येने बनावट नोटा जप्त करण्यात आल्यायत. या नोटा कोण छापतंय? हुबेहूब दिसणाऱ्या नोटा छापण्याची मशिन आली कुठून? बोगस नोटा छापण्यामागे कुणाचा हात आहे? याचा शोध घेऊन हे रॅकेट उद्ध्वस्त करायला हवं. नाहीतर अनेकांची मोठी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला कुणी 2 हजारांची नोट दिली तर ती आधी तपासून पाहा.


संबंधित बातम्या

Saam TV Live