बदलापूरचे गणपती बाप्पा निघाले परदेशवारीला !

अजय दुधाणे
शनिवार, 5 जून 2021

बदलापूरचे गणपती बाप्पा यंदा कोरोनाची चेन ब्रेक करत थेट अमेरिकेच्या वारीला निघाले आहेत. बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्समधून २ हजार गणेशमूर्ती अमेरिकेला रवाना झाल्या आहेत.

बदलापूर : बदलापूरचे Badlapur गणपती बाप्पा यंदा कोरोनाची Corona चेन ब्रेक Break the chain करत थेट अमेरिकेच्या America वारीला निघाले आहेत. बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्समधून २ हजार गणेशमूर्ती अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. 2000 idols of Lord Ganesha have been sent to America from Badlapur

बदलापुरातील निमेश जनवाड हा तरुण गेल्या काही वर्षांपासून गणेशमूर्ती तयार करून परदेशात पाठवण्याचं काम करतो. त्याच्या गणेशमूर्तींना अमेरिकेसह आखाती देश, ऑस्ट्रेलिया Australia या देशांमध्ये मोठी मागणी आहे. बदलापूरहून अमेरिकेच्या वारीला निघालेल्या २ हजार बाप्पांची पहिली कन्साईनमेंट नुकतीच रवाना झाली. 

छत्रपती संभाजी राजेंचा आदर्श नारायण राणेंनी घ्यावा - विनायक राऊत

निमेश याचं गणेशमूर्ती निर्यातीचं हे सहावे वर्ष आहे. २०१९ साली निमेश याने साडेतीन हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या होत्या. तर मागील वर्षी निर्यात बंद असल्यानं त्याला तब्बल ४० लाख रुपयांचा फटका बसला होता.

हे देखील पहा - 

मात्र यावर्षी त्याला तब्बल १० हजार गणेशमूर्तींची ऑर्डर आहे. लवकरच जहाजामार्गे या मूर्ती अमेरिका, युरोप, आखाती देश आणि ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. 

Edite By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live