वासनांध बँकवाला; शेतकऱ्याच्या पत्नीकडे केली शरीर सुखाची मागणी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 जून 2018

पीक कर्ज मंजूर करून देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार उघड झालाय. या प्रकरणात सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखा अधिकाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा आरोपी सध्या फरार झालाय.

बुलडाणा जिल्ह्यातल्या दाताळा गावातील शेतकरी त्याच्या पत्नीसोबत पिक कर्जासाठी गुरूवारी सेंट्रल बँकेत गेला होता. कागदपत्रांची चाळणी करून तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना बँक व्यवस्थापकाने केली.

संबंधित शेतकऱ्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्लिल संभाषण करून शरीरसुखाची मागणी केली.  मोबदल्यात पिककर्जासोबत वेगळा पॅकेज देईल, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठविला. संबंधित महिलेने बँक व्यवस्थापकाशी झालेल्या संवादाचं रेकॉर्डींग करून मलकापूर ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदवली.  

त्यानंतर पोलिसांनी चौकशी अंती गुरूवारी रात्री सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live