भंडारा शहरात 21 इमारती धोकादायक स्थितीत, दुर्घटनेची शक्यता !

अभिजीत घोरमारे
बुधवार, 9 जून 2021

भंडारा शहरात तब्बल 21 इमारती धोकादायक स्थितीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भंडारा नगर परिषदेने केलेल्या सर्वेक्षणातून हे वास्तव उघड झाले आहे.

एंकर- भंडारा शहरात तब्बल 21 इमारती धोकादायक स्थितीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भंडारा नगर परिषदेने केलेल्या सर्वेक्षणातून हे वास्तव उघड झाले आहे.21 buildings in dangerous condition in Bhandara city, possibility of accident

शहरात अजुन 10 इमारती धोकादायक स्थितीत येणार असल्याने ही संख्या वाढणार आहे. भंडारा नगरपरिषदेने ह्या सर्व इमारती मालकांस नोटिसा देखील बजावल्या असून सदर  इमारती पडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता स्थानिकांकडून आणि प्रशासनाकडून देखील उपस्थित  आहे. 

बलात्कार करून पळ काढणाऱ्या नराधमांना गोंदिया रेल्वे पोलिसांकडून बेड्या !

मागच्याच वर्षी भंडारा जिल्हावासियांनी महापुराचा अनुभव घेतला आहे. शिवाय यंदा पाऊस चांगला असल्याचे संकेत हवामान खात्याने दिल्याने आता मागच्या पुराचा बोध घेत प्रशासान कामाला लागले आहे.

जिल्ह्यात मान्सूनपूर्व करावयाच्या कामांचा सपाटा लागला असून बचाव पथकाद्वारे प्रात्यक्षिके देखील घेतली जात आहेत. त्यातच मागील वर्षी च्या महापुराने भंडारा नगरपरिषदेची पोलखोल केली होती.

हे देखील पहा -

त्या संकटाऊन अजूनही भंडाऱ्यातील नागरिक सावरले नसताना, आता चक्क भंडारा नगर परिषदेच्या 21 इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे समोर आले आहे. यात अजूनही भर पडण्याची शक्यता असल्याने नगरपरिषदेची चिंता वाढली असून जर ह्या इमारती पडल्या आणि दुर्दैवाने जीवित हानी झाली तर त्याला जबाबदार कोण हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

नगरपरिषदेने सदर इमारती मालकांना नोटीस देखील पाठवल्या आहेत. मात्र  असून आता इमारती मालक व भंडारा नगरपरिषद प्रशासान याच्यावर काय कारवाई करणार आहे हे अजून अनुत्तरित आहे.

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live