‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' अस म्हणत 21 गुजराती व्यावसायिक हे शिवसेनेत प्रवेशही करणार आहेत

SAAM TV
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

मुंबईतील गुजराती माणूस म्हणजे भारतीय जनता पक्षाचा मतदार अशी ढोबळमानाने धारणा आहे. अशात आता मुंबईतील गुजराती मतदाराला आकर्षित करण्यासाठी शिवसेनेना विविध क्लुप्त्या आजमावताना पाहायला मिळतेय. 

मुंबई -  शिवसेनेनं गुजराती बांधवांसाठी 'मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा.' नंतर आता  'रासगरबा' चं आयोजन केलंय....7 फेब्रुवारीला गुजराती बांधवांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन कऱण्यात आलंय....या कार्यक्रमात 21 गुजराती उद्योजक आणि व्यावसायीक शिवसनेत प्रवेश कऱणार आहेत....शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय....मुंबई महापालिका निवडणुकीला आता एक वर्षाचा अवधी उरलांय....त्यामुळे प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित कऱण्यासाठी या नवीन क्लुप्त्या आखताना दिसतय....शिवसेनेनंही असाच प्रयत्न केलाय....

 

मुंबईतील गुजराती माणूस म्हणजे भारतीय जनता पक्षाचा मतदार अशी ढोबळमानाने धारणा आहे. अशात आता मुंबईतील गुजराती मतदाराला आकर्षित करण्यासाठी शिवसेनेना विविध क्लुप्त्या आजमावताना पाहायला मिळतेय. 

 

 

या आधी शिवसेनेने खास मुंबईतील गुजराती माणसासाठी ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' चा नारा देत जिलेबी, फाफडा, वडापावचा बेत आखला होता. शिवसनेच्या या कार्यक्रमाला चांगलं प्रतिसाद देखील लाभला होता. दरम्यान आता शिवसेनेने आणखीन एक पाऊल पुढे टाकत गुजराती बांधवांसाठी 7 फेब्रुवारी रोजी आणखी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमात शिवसेनेने गुजराती माणसासाठी 'रासगरबा' चं आयोजन केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या कार्यक्रमादरम्यान 21 गुजराती व्यावसायिक हे शिवसेनेत प्रवेशही करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेला अधिक बळकटी नक्कीच मिळेल असं बोललं जातंय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live