'कुछ कुछ होता है'ला 21 वर्षे पूर्ण ,तुम्हाला माहित आहे का ? सिनेमाविषयी 21 गोष्टी

'कुछ कुछ होता है'ला 21 वर्षे पूर्ण ,तुम्हाला माहित आहे का ? सिनेमाविषयी 21 गोष्टी

बॉलिवुडमध्ये असे काही सिनेमे आहेत ज्यांची हवा काही काळापुरतीय मर्यादीत राहिली आहे. मात्र असेही काही सिनेमे आहेत ज्यांची चर्चा काही दशकांनंतरही कायम आहे. अशा सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे 'कुछ कुछ होता है'. 16 ऑक्टोबर 1998 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. आज या सिनेमाला तब्बल 21 वर्षे पूर्ण होत आहेत.

90च्या दशकातील करण जौहर दिग्दर्शित  ब्लॉकबस्टर  'कुछ कुछ होता है' सिनेमाविषयी तुम्हाला माहित नसलेल्या 21 गोष्टी


1. हा सिनेमा चित्रीत करत असताना राणी मुखर्जी 19 वर्षांची होती.


2. शाहरुख आणि काजोलने बास्केटबॉल खेळत असतानाच्या सिनसाठी उड्या मारताना ट्रॅम्पोलाईन वापरले होते.


3. 'ये लडका है दिवाना' गाण्यातील सायकलवरील सिन करत असताना  काजोल सायकलवरून जमिनीवर कोसळली  आणि बेशुद्ध झाली होती.  


4. परझान दस्तुरने साकारलेला लहान पंजाबी बॉयच्या एका डायलॉगसाठी दुसऱ्या लहान मुलाचा आवाज देण्यात आला होता.  


5. शाहरुख, काजोलचा समर कॅम्पमधील रियुनियन सिन पाहताना करण जौहर रडला होता.


6. मनीष मल्होत्रा, फराह खान, कोरिओग्राफर गीता कपूर, दिग्दर्शक निखील अडवाणी, करण जौहरची आई हीरु हे या सिनेमातील विविध सिन्समध्ये दिसले होते.


7. अमनची भूमिका सैफने रिजेक्ट केल्यावर एका पार्टीत करणने सलमानला या भूमिकेसाठी कास्ट केलं होतं.


8. सिनेमातील राणी मुखर्जीची भूमिका ट्विंकल खन्नाला ऑफर करण्यात आली होती.


9. सिनेमाचं चित्रीकरण 21 ऑक्टोबर 1997मध्ये सुरु करण्यात आलं होतं, 10 महिन्यात सिनेमाचं शुटिंग आटपण्यात आलं होतं.


10. सुरुवातीला शाहरुखला या सिनेमाची कहाणी बकवास वाटली होती.


11. सिनेमासाठी टेक्निकल टीम नसल्याने शाहरुख स्वत: छोट्या छोट्या गोष्टींसाठी मार्गदर्शन करते असे.


 12. राणी मुखर्जीच्या हस्की आवाजामुळे करणने राणीच्या आवाजाचं डबिंग करण्याचा निर्णय घेतला होता, नंतर त्याने हा निर्णय बदलला.


13. शिमलामधील समर कॅम्प सिन ऊटीमध्ये चित्रीत करण्यात आला होता.


14. 'कुछ कुछ होता है' हे टाईटल ट्रॅक 10 दिवसांत शूट करण्यात आलं होतं.


15.'कुछ कुछ होता है'ने पहिल्याच दिवशी 87 लाख इतकी कमाई केली होती.


16. शाहरुख आणि काजोलने करणला त्याच्या पहिल्या डिरेक्टोरियल डेब्यूमध्ये काम करणार असल्याचं वचन दिलं होतं.


17. छोट्या अंजलीची भूमिका साकारणाऱ्या सनाने रडताना ग्लिसरीन वापरण्यास नकार दिला होता, करणने सनाला सिनसाठी खरंखुरं रडवलं होतं.


18. हा सिनेमा आर्ची कॉमिक्सवर आधारित होता.


19. सिनेमातील शाहरुखचा पोलो टीशर्ट विकत घेताना करण आणि मनीष मल्होत्रामध्ये 3 तास चर्चा झाली होती.


20. सिनेमातील टीनाच्या भूमिकेच्या मृत्यूची युक्ति काजोलने सुचवली होती.


21.  राहुल-अंजलीचा क्लायमॅक्स सिन पाहून काजोल रडली होती.

WebTittle:: 21 years to 'Kuch Kuch Hota Hai', you know? 21 things about cinema


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com