#21daylockdown | पांडुरंगा महाराष्ट्राला लढण्याचं बळ दे! आपण लढू आपण जिंकू

भारत नागणे
बुधवार, 25 मार्च 2020

पंढरपुरातील विठुरायाचा गाभारा गुढीपाडव्यानिमित्त सजला, कोरोनाला रोखण्याचं बळ आम्हाला दे, महाराष्ट्राचं माऊलींना साकडं

पंढरपूर - आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलंय. मंदिरात चाफ्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आलीय. तसंच विठ्ठलाला गुलाबी अंगरखा आणि निळया रंगाचे धोतर तर रुक्मिणी मातेला लाल रंगाची साडी असा पोशाख परिधान करण्यात आला..दरवर्षी गुढीपाडव्याला मंदिरात मोठी गर्दी होत असते. पण यंदा मात्र भाविकांना विठ्ठलाचं दर्शन घेता येणार नाही. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मंदिर दर्शनासाठी बंद केलंय. त्यामुळे भाविकांना नव वर्षातील दर्शनाचा लाभ चुकणार आहे. मात्र मंदिर बंद असलं तरी देवाचे नित्योपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रातील रुग्णांचा आकडा एकीकडे वाढतच चालला आहे. अशात सगळ्यांनीच विठुरायाकडे कोरोनाला रोखण्यासाठी बळ देण्याची प्रार्थना केली आहे. संचारबंदी असेपर्यंत महाराष्ट्रातील जवळपास सर्वच तीर्थक्षेत्रं बंद आहेत. गर्दीची ठिकाणी टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अशातही आज गुढीपाडवा असल्याने विठुरायाचा गाभारा सजला आहे. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखम्यासाठी विठ्ठल मंदिर प्रशासनाने मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून मंदिर आणि आवारातील नेहमीच गजबजलेला असणारा परिसर  एकदम शांत असल्याचं पाहायला मिळतंय.

 

देशात कोरोनाचा 11वा बळी - 

देशात कोरोनाचा 11वा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. तामिळनाडूत करोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मदुराईच्या राजाजी रुग्णालयात या कोरोनाग्रस्तावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालाय. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. तर देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 580 झालाय. आज एका दिवसात देशभरात 12 रुग्णांची भर पडलीय.

 

जगभरात कहर सुरुच - 

जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. जगभरात 4 लाख 14 हजार 991 जणांना लागण झाली आहे. तर 18,589 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचे 11 बळी, 568 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर केरळ तर महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. 

 

हेही वाचा - कोरोनाची लागण झालेलं ते दाम्पत्य पूर्ण बरं झालं, मिळाला डिस्चार्ज

हेही वाचा - नडला की फोडला, पोलिसांचं धोरण, पहा कुणाला कसा फोडला

21Daylockdown gudipadva vitthal madir prayer to fight against covid 19 marathi


संबंधित बातम्या

Saam TV Live