225 कोटींचा फ्रॉड पोलिसांनी रोखला, पुणे पोलिसांकडून 10 जणांना अटक

साम टीव्ही
गुरुवार, 18 मार्च 2021

निष्क्रिय खात्यांमधील पैशांवर सायबर गुन्हेगारांचा डोळा
225 कोटींचा फ्रॉड पोलिसांनी रोखला
पुणे पोलिसांकडून 10 जणांना अटक

 

 

वापरात नसलेल्या बँक खात्यांवर 225 कोटींचा सायबर दरोडा घालण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी हाणून पाडलाय. या प्रकरणात हायप्रोफाईल टोळीला गजाआड केलंय. 

बँक खात्यात पैसे असतील आणि ते खातं तुम्ही वापरत नसाल तर तुमचे पैसे सुरक्षित आहेत असं नाही. निष्क्रिय म्हणजे डोरमॅट अकाऊंटची माहिती सायबर गुन्हेगारांना विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. पुणे पोलिसांनी या प्रकरणी दहा जणांना अटक केलीय. यात काही संगणक अभियंतेही आहेत.  या टोळीनं निष्क्रिय खात्यांची माहिती गोळा केली होती. या माहितीची 25 लाखांमध्ये सौदा ठरला होता. या माहितीआधारे जवळपास 225 कोटी रुपये लांबवण्याचा डाव होता.  पण पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्यात.

 आरोपींमध्ये रोहन मंकणी, राजेश शर्मा आणि परमजीतसिंग संधू अशा हायप्रोफाईल लोकांचा समावेश आहे. या आरोपींनी यापूर्वी अशाप्रकारचे गुन्हे केलेत का याचा पोलिस शोध घेतायत.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live