भारतात अॅपलचे आयफोन बंद होणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 जुलै 2018

सध्या ट्राय आणि ऍपलमध्ये एका ऍपवरून खडाजंगी झाली असून भारतात अॅपलचे फोन बंद होतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

फेक कॉल्स आणि स्पॅम मेसेजचा त्रास मोबाईल वापरकर्त्यांना होऊ नये म्हणून ट्रायने DND 2.0 या अॅपची निर्मिती केली आहे. हे अॅप सध्या ऍन्ड्रॉईडच्या प्लेस्टोअर वर उपलब्ध आहे. पण ऍपलने आपल्या आय स्टोरमध्ये या अॅपला जागा दिलेली नाही.

मोबाईल वापरकर्त्याने हे अॅप डाऊनलोड केल्यास फ़ेक कॉल्स आणि स्पॅम मेसेजपासून त्याची सुटका होईल. पण अॅपलने या अॅपला आपल्या अॅपस्टोअरमध्ये जागा दिली नाही आणि त्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की हे अॅप वापरण्यासाठी युजर्सचे फोन कॉल रेकॉर्ड करण्याची परवानगी हे अॅप मागते. त्यामुळे युजर्सच्या खाजगी आयुष्यावर गदा येते. यासाठी अॅपल स्वतः एक DND अॅपची निर्मिती करत आहे.

जर अॅपलने आपल्या स्टोरमध्ये या अॅपला जागा नाही दिली तर भारतीय नेटवर्कमध्ये ऍपलचे फोन चालणार नाही. त्यामुळे अॅपलचे फोन वापरणाऱ्यांना नाहक मनस्ताप भोगावा लागेल.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live