मराठा समाजाकडून उद्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड बंदची हाक

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 जुलै 2018

मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजानं आक्रमक पवित्रा घेतलाय. दादरमध्ये पार पडलेल्या बैठकीत उद्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये बंदची हाक देण्यात आलीय. उद्याच्या बंदमध्ये कोणताही अनुचित प्रकार होणार नाही असं आश्वासन आयोजकांनी दिलंय.

दादरमधल्या राजर्षी शाहू सभागृहात आज मराठा क्रांती मोर्चाची बैठक बार पडली.विशेष म्हणजे उद्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद राहणार असल्यानं भाज्या तसच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर परिणाम होणारंय. दहावी, बारावीची फेर परीक्षा असल्यानं शाळा आणि महाविद्यालयांना बंदमधून वगळण्यात आलंय.

या बैठकीत आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, राज्यसरकारनं मेगाभरती तत्काळ थांबवावी, मुख्यमंत्र्यांनी माफी मागून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आलीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live