२४ तासांत राज्यात १५० पोलिसांना कोरोनाची लागण

साम टीव्ही न्यूज
रविवार, 10 मे 2020

अनेक पोलिस कुटुंबांसोबत संपर्क येऊ नये म्हणून काही दिवस पोलिस ठाण्यांत तर काही दिवस घरी राहात आहेत. करोनापासून बचावासाठी सर्व काही काळजी घेत असूनही नागरिक नियम पाळत नसल्याने पोलिसांवरील ताण अधिक वाढत आहे.पोलिस करोनाबाधित होत असल्याचा फटका त्यांच्या कुटुंबीयांनाही बसत आहे. संपर्कात आल्याने पोलिस कुटुंबीयांचेही विलगीकरण करावे लागत आहे. त्यामुळे पोलिस वसाहतींमध्ये प्रचंड भय आहे. 

गेल्या २४ तासांत राज्यात दीडशे पोलिसांना लागण झाली आहे. यामुळे राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या ७१४वर पोहोचली आहे.
नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो. यामुळे पोलिसांना करोनाची लागण झपाट्याने होत आहे. राज्यात ७१४ पोलिसांना करोनाची लागण झाली असून, आतापर्यंत पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. ७१४ पोलिसांमध्ये ८१ अधिकारी आणि ६३३ कर्मचारी यांचा समावेश आहे. मुंबईत करोनाबाधित पोलिसांची संख्या अडीचशेच्या घरात आहे. शेकडो पोलिसांमध्ये करोनासदृश लक्षणे दिसत असून, राज्यभरात सुमारे तीन हजार पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे.मुंबई आणि महाराष्ट्रात करोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. लॉकडाउन अधिक कडक करण्याच्या प्रयत्नात राज्य सरकार असताना लोकांमध्ये मात्र गांभीर्य नाही. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. 

अनेक पोलिस कुटुंबांसोबत संपर्क येऊ नये म्हणून काही दिवस पोलिस ठाण्यांत तर काही दिवस घरी राहात आहेत. करोनापासून बचावासाठी सर्व काही काळजी घेत असूनही नागरिक नियम पाळत नसल्याने पोलिसांवरील ताण अधिक वाढत आहे.पोलिस करोनाबाधित होत असल्याचा फटका त्यांच्या कुटुंबीयांनाही बसत आहे. संपर्कात आल्याने पोलिस कुटुंबीयांचेही विलगीकरण करावे लागत आहे. त्यामुळे पोलिस वसाहतींमध्ये प्रचंड भय आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live