धारावीत कोरोनाचे २५ नवे रुग्ण 

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 9 मे 2020

गेल्या चार दिवसात एकट्या धारावीतून गुजरात व राजस्थानला जाणार्‍या 12 बस, 2 टेम्पो ट्रॅव्हलर, 1 इंनोव्हा, 1 स्कॉर्पिओ मधून जवळपास 450 प्रवासी मूळगावी रवाना झाले आहेत.  धारावीत गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 25 नवे रुग्ण सापडले असून  कोरोना बाधितांचा आकडा 808 वर गेला आहे.


एकीकडे कोरोनाच्या प्रकोपामुळे येथील कष्टकरी जनता भयभीत झाली असून, येथील व्यापारी, उद्योगपतीनी धारावी सोडून मूळगावी राजस्थान, गुजरातकडे जाण्याचा मार्ग निवडला आहे. गेल्या चार दिवसात एकट्या धारावीतून गुजरात व राजस्थानला जाणार्‍या 12 बस, 2 टेम्पो ट्रॅव्हलर, 1 इंनोव्हा, 1 स्कॉर्पिओ मधून जवळपास 450 प्रवासी मूळगावी रवाना झाले आहेत.  धारावीत गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 25 नवे रुग्ण सापडले असून  कोरोना बाधितांचा आकडा 808 वर गेला आहे. त्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्याही 26 वर पोहचली आहे.

गेल्या चोवीस तासात धारावीतील झोपड्पट्टीबहुल भागात थैमान घालणार्‍या कोरोनाने माटुंगा लेबर कॅम्प, कुंचिकोरवे नगर, आझाद नगर, राजीव गांधी नगर, गांधी नगर, शास्त्री नगर, मदिना कंपाऊंड, मुस्लिम नगर, नवी चाळ, काळा किल्ला, जयगुरू सोसायटी, ट्रान्झिस्ट कॅम्प, फातिमा चाळ, पीएमजीपी कॉलनी, बालाजी नगर, के एम चाळ, धारावी पीसी, धारावी मेन रोड, समाधान सोसायटी, इंदिरा नगरमधील 25 जणांना लक्ष केले असून यात 6 महिला व 19 पुरुष आहेत. समाधानाची बाब म्हणजे आजपर्यंत एकूण 222 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

WebTittle ::  25 new corona patients in Dharavi


  


संबंधित बातम्या

Saam TV Live