भारतीय जैन संघटना आणि मोतीलाल ओसवाल फाऊंडेशनतर्फे २५० ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध

donation
donation

नंदुरबार -  जिल्ह्यातील सातपुडा अतिदुर्गम धडगाव, अक्कलकुवा, मोलगी, तोरणमाळ परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन बेडची सुविधा नाही अशी बातमी साम टीव्हीने प्रसारित केल्या नंतर त्याची दखल घेऊन भारतीय जैन संघटना bharatiya Jain Association आणि मोतीलाल ओसवाल फाऊंडेशन Motilal Oswal Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने आज नंदुरबार Nandurbar जिल्ह्याला शंभर ऑक्सिजन Oxygen कॉन्सट्रेटर देण्यात आले आहे. या संघटनेने तब्बल अडिचशे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि एक रुग्णवाहीका नंदुरबारच्या आरोग्य व्यवस्थेला देण्याची घोषणा केली होती. त्याचाच भाग म्हणुन आज लागलीच शंभर ऑक्सिजन कॉन्सट्रेटर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे.  250 Oxygen Concentrators available through bharatiya Jain Association

मुळात नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असणाऱ्या मोलगी, धडगाव आणि तोरणमाळ परिसरात ज्या ठिकाणी विजेच्या दाबाच्या अडचणी आहेत. त्याठिकाणी मोठे ऑक्सिजन प्रकल्प कार्यन्वीत होवु शकत नाही अशा भागात हे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर  खऱ्या अर्थाने लाभदायक ठरणार आहे. अवघ्या दोनच दिवसांपुर्वी  जिल्हाधिकाऱ्यांनी मोतीलाल ओसवाल परिवाराला याबाबत मागणी केली होती.

या परिवाराच्या विमला या नंदुरबारच्या कन्या असल्याने आपल्या मातीचे रुण फेडण्यासाठी त्यांनी तात्काळ ही मदत नंदुरबार जिल्हासाठी केली आहे. विशेष म्हणजे याआधीही २०१८ मध्ये भारतीय जैन संघाने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थीतीबाबत मोठ काम केले होते. आज भारतीय जैन संघाचे काही सदस्य आणि खासदार डॉ. हिना गावित आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीमध्ये हे सर्व ऑक्सिजन कॉन्सट्रेटर हस्तांतरीत करण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com