चेंबुर मधील 'बीपीसीएल' कंपनीत स्फोट

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

चेंबूर येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (बीपीसीएल) हायड्रोजन टॅंकमध्ये आज (बुधवार) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग लागली. या स्फोटामुळे काही किलोमीटरच्या परीसराला हादरे बसले.

या आगीमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्याने शेकडो कर्मचारी अडकले आहेत. मुंबई अग्निशमन दला बरोबर नाविक दलाचे अग्निशमन दलही घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्या बरोबरच कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

चेंबूर माहूल परीसरात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशच्या रिफायनरी आहेत. येथे कच्च्या तेलावर प्रक्रिया करुन पेट्रोल डिझेल देशभरात पाठवले जाते. चेंबूर येथील गवाण गाव परीसरातील या तेल शुध्दीकरण प्रकल्पामधील एका टॅंकमध्ये दुपारी अचानक स्फोट झाला.

या स्फोटामुळे चेंबूर परीसराला भुकंपासारखे हादरे बसले. नंतर प्रचंड धूर होऊन आगीच्या ज्वाळाही काही किलोमीटरपर्यंत दिसत होत्या. या टॅंकमध्ये हायड्रोजनचा साठा असल्याचा प्रथमिक माहिती मिळत आहे. या आगीची धग प्रचंड असल्याने कंपनीतील कर्मचाऱ्यांना बाहेर येण्यास अडचणी येत आहेत. अग्निशमन दलाचे 10 बंब आणि दोन फोनचे टॅंक घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांना कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live