सावधान! पृथ्वीवर येतंय महाप्रलयाचं संकट, गेल्या 30 वर्षात विरघळला 28 ट्रिलियन टन बर्फ 

साम टीव्ही
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020
  •  
  • सावधान! पृथ्वीवर येतंय महाप्रलयाचं संकट
  • गेल्या 30 वर्षात विरघळला 28 ट्रिलियन टन बर्फ 
  • समुद्र साऱ्या जगाला गिळणार?

कोरोनासंकटामुळे आधीच सारं जग हैराण आहे. त्यात आता आणखी एका संकटाची चाहूल लागलीय. जगासाठी हे खूप मोठं संकट असणारंय. हे संकट आहे महाप्रलयाचं. या वसुंधरेवर नेमकं काय घडतंय आणि भविष्यात याचे किती गंभीर परिणाम असू शकतात, तुम्हीच पाहा..

कोरोनामुळे सारं जग संकटात आहे.अशातच आणखी एक वाईट बातमी पुढे आलीय. वाढत्या तापमानामुळे गेल्या 30 वर्षात पृथ्वीवरील तब्बल 28 ट्रिलियन टन बर्फ विरघळल्याचं समोर आलंय. 

हवामान बदल, पृथ्वीवरील वाढत्या तापमानाची चिंता व्यक्त केली जात असताना ब्रिटिश शास्त्रज्ञांनी ही धक्कादायक माहिती समोर आणलीय.
ग्रीन हाऊसमध्ये वाढत्या गॅसच्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी हे संशोधन करण्यात आलं. शास्त्रज्ञांचं संशोधन क्रियोफेअर डिस्कशन जर्नलमध्ये प्रकाशित झालंय. त्यात म्हंटलंय की या शतकाच्या अखेरपर्यंत समुद्राच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. लाखो लोकांना विस्थापित व्हावं लागेल. 

एडिनबर्ग विद्यापीठ आणि युनिर्व्हसिटी कॉलेज लंडनमधील संशोधनकर्त्यांनी 1994 ते 2007 दरम्यान उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या सॅटेलाइट फोटोंचा अभ्यास केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, निम्म्याहून अधिक बर्फ हा उत्तर गोलार्धात वितळलाय. तर, उर्वरित दक्षिण गोलार्ध भागातील वितळलाय.  1990 नंतर बर्फ वितळण्याचा दर 57 टक्क्यांहून अधिक आहे. आता हा दर 0.8 टक्क्यांहून अधिक वाढला असून 1.2 ट्रिलियन प्रतिवर्ष इतका झालाय. 

बर्फ वेगानं वितळत असल्यामुळे सूर्यकिरणं पृथ्वीपासून पुन्हा अंतराळात परावर्तित होण्याची क्षमता कमी होत चाललीय. त्यामुळे अंटार्टिकामध्ये पाण्यात मोठ्या प्रमाणावर बदल पाहण्यास मिळतोय. बर्फ वितळ्याचा वेग वाढत असल्यानं समुद्राच्या पाणीपातळीतही वाढ होतीय. हे असंच सुरू राहिलं तर महाप्रलयाच्या रूपात  वसुंधरेचा विनाश अटळ आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live