अशी होते पेट्रोल-डिझेलची दरवाढ;  39 रुपयांच्या पेट्रोलवर 43 रूपये तर 42 रुपयांच्या डिझेलवर 30 रुपयांचा टॅक्स

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

देशात इंधन दरवाढीचा भडका उडालाय. पेट्रोल डिझेलच्या चढ्या किंमतीमुळे जिवनावश्यक वस्तू 15 टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे. पेट्रोलच्या किंमती नव्वदीच्या घरात असताना तुम्हा आम्हा सामान्यांना पेट्रोल आणि डिझेलची उत्पादन किंमत आणि विक्री किंमती किती असेल असा प्रश्न पडलाय.

साम टीव्ही आज पेट्रोलची उत्पादन किंमत आणि विक्री किंमत किती आहे हे सांगणार आहे. पेट्रोलची उत्पादन किंमत 39 रुपये 27 पैसे आहे. त्यावर केंद्र सरकार 19 रुपये 48 पैसे उत्पादन शुल्क आकारतं राज्य सरकार यावरही कडी करतंय. राज्य सरकार 23 रूपये 98 पैसे व्हॅट आकारतं. पेट्रोलपंप मालकांचं कमिशन 3 रूपये 64 पैसे होते. गाडीच्या टाकीत पेट्रोल पडताना 39 रुपयांचं पेट्रोल 86 रुपये 37 रुपयांना पडतं.

हेच डिझेलबाबत आहे. डिझेलची उत्पादन किंमत 42 रुपये 90 पैसे आहे. त्यावर केंद्र सरकार 15 रुपये 33 पैसे उत्पादन शुल्क आकारतं. राज्य सरकार 14 रुपये 58 पैसे व्हॅट आकारतं.तर डिझेल विक्रीचं कमीशन 2 रुपये 53 पैसे आहेत. त्यामुळं चारचाकी वाहनात डिझेल टाकताना ते लिटरला 75 रुपये 34 पैशांना पडतं.GFXOUT
साम टीव्हीनं पेट्रोल डिझेलची नफेखोरी जेव्हा सामान्यांना समजावून सांगितली तेव्हा लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.

गोवा आणि दिल्ली सरकारनं पेट्रोल डिझेलवरचे कर कमी करून सामान्यांना दिलासा दिला होता. असाच दिलासा देशातली इतर राज्य का देऊ शकत नाही असा सवाल विचारला जातोय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live