कुर्ला स्थानकाबाहेर रेल्वेच्या हद्दीतली भिंत कोसळून तीघेजण जखमी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

कुर्ला पश्चिमेकडे सकाळीच रेल्वेच्या हद्दीत असणारी एक 20 फुटांची भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत एक पानवाला आणि इतर दोन असे तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, वारंवार तक्रार करूनही रेल्वेने दुर्लक्ष केल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. जखमींनी भाभा रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे.

कुर्ला स्थानकाबाहेर रेल्वेच्या हद्दीतली एक भिंत कोसळल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच ही रेल्वेची भिंत होती. तब्बल 20 फुटांहून उंच असलेली ही भिंत अचानक कशी कोसळली? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, ही भिंत कोसळल्यामुळे तीन जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. कुर्ला पश्चिमेकडच्या हरियाणावाला लेनवर ही भिंत होती. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून खाली पडलेला मलबा हटवून रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू आहे. जखमींना भाभा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

या भिंतीच्या बाजूलाच एक पानवाल्याचा ठेला आहे. सकाळची वेळ असल्यामुळे पानवाल्याच्या ठेल्यावर मुंबईकरांची गर्दी होती. मात्र, अचानकच ही भिंत कोसळल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. या दुर्घटनेमध्ये पानवाल्याच्या डोक्याला दुखापत झाली असून ठेल्यावरच्याच आणखी एका व्यक्तीला पायाला जबर दुखापत झाली आहे. त्याशिवाय आणखीही एक व्यक्ती जखमी झाली असून तिच्याविषयी सविस्तर माहिती मिळू शकली नाही.

संबंधित बातम्या

Saam TV Live