मोक्षासाठी 3 तरुणांनी घेतला गळफास, वाचा पुरोगामी महाराष्ट्रातील हे अंधश्रध्देचे बळी

साम टीव्ही
रविवार, 22 नोव्हेंबर 2020
  • शहापूरमधील घटनेनं पुरोगामी महाराष्ट्र हादरला
  • पुरोगामी महाराष्ट्रात मोक्षासाठी मृत्यूची साक्ष?
  • तिघांच्या आत्महत्येमागे मोक्षप्राप्तीचा हव्यास?

बातमी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळिमा  फासणारी. ठाण्याजवळच्या शहापूरमध्ये तीनजणांनी आत्महत्या केलीय. यातली धक्कादायक बाब ही की, पोलिसांच्या तपासात ही आत्महत्या मोक्ष मिळण्यासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय.

पाहा व्हिडीओ -

ही घटना महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आहे. ठाणे जिल्ह्यातील खर्डीच्या चांगा गावातील दोघांनी आणि शहापूरमधल्या एकाने झाडाला फास घेत आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलंय. यातील खर्डीतील मामा महेंद्र दुभेले, भाचा मुकेश घायवट आणि शहापूरच्या नितीन भैरेनं जंगलातील झाडाला फास घेत आयुष्य संपवलंय. धक्कादायक गोष्ट ही की, या तिघांनीही मोक्ष मिळावा म्हणून स्वत:चं आयुष्य संपवल्याचा संशय पोलिसांना आहे.

अंधश्रद्धेच्या छाताडावर बसून श्रद्धेची सात्विक भक्ती करणाऱ्या महाराष्ट्राला ही घटना लाज आणणारी आहे. डोळसपणे श्रद्धेचा दिवा लावणाऱ्या महाराष्ट्राला अंधश्रद्धेतून मृत्यूची धग शोभणारी नाही. कसला मोक्ष आणि कसलं काय. जगातलं कोणतंच युद्ध स्वत:ला संपवून जिंकता येत नाही. जान सलामत तो पगडी पचास सांगणाऱ्या काळात जगणं असं संपवणं बरं नव्हे. लिंबात टाचण्या खोवून सुखाच्या बाता मारणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वातला विज्ञानवाद विसरायला नको.


संबंधित बातम्या

Saam TV Live