रायगड जिल्ह्यात रुग्णसेवेसाठी 30 रुग्णवाहिका दाखल...

दिनेश पिसाट
शुक्रवार, 4 जून 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनला भेट दिली. यावेळी तौक्ते वादळ नुकसान व कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

रायगड - उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar व आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी आज रायगड जिल्ह्यातील Raigad district श्रीवर्धनला भेट दिली. यावेळी तौक्ते वादळ नुकसान व कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी राजेश टोपे यांनी रायगडला अर्बन हेल्थ पब्लिक सेंटर दिलेले आहेत. हे सर्व 9 सेंटर या वर्षी उभे राहतील. 30 ambulances arrived in Raigad district

हरवलेल्या बालकाचा शोध घेण्यासाठी धुळे पोलिसांचा "ऑपरेशन मुस्कान" उपक्रम

पुढे ते म्हणाले की, 30 रुग्णवाहिका रायगड जिल्ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयाला उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या राज्यात म्युकर मायकोसिस आजाराची चिंता सतावत आहे. या आजारावर सरकारी रुग्णालयात संपूर्णतः मोफत इलाज केला जाईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

हे  देखील पहा -

तसेच महात्मा जोतिबा फुले योजनेतून देखील या आजाराचा मोफत उपचार केला जाईल, खाजगी रुग्णालयात भरमसाठ बिले येत असल्याची सातत्याने ओरड होत आहे, त्या अनुषंगाने खाजगी रुग्णालयातील बिलाच्या रकमेवर देखील सरकारचे नियंत्रण राहील असे राजेश टोपे म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live