धक्कादायक! महावितरणचा शेतकऱ्यांना फसवून तब्बल 30 हजार कोटींचा घोटाळा...

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

महावितरणने वीज वापराच्या आकड्यांमध्ये गोलमाल करत गेल्या ५ वर्षांत तब्बल ३० हजार कोटींचा घोटाळा केलाय. शेतकऱ्यांना वर्षाला तब्बल ३३ हजार ८५६ दशलक्ष युनिट वीज पुरवल्याचा दावा महावितरणनं केला होता.

महावितरणने वीज वापराच्या आकड्यांमध्ये गोलमाल करत गेल्या ५ वर्षांत तब्बल ३० हजार कोटींचा घोटाळा केलाय. शेतकऱ्यांना वर्षाला तब्बल ३३ हजार ८५६ दशलक्ष युनिट वीज पुरवल्याचा दावा महावितरणनं केला होता.

मात्र, प्रत्यक्षात २२ हजार ८५६ दशलक्ष युनिट एवढाच शेतकऱ्यांचा वीज वापर असल्याचं वीज नियामक आयोगाच्या  चौकशीत स्पष्ट झालंय. त्यामुळे वाढीव वीज वापर दाखवून महावितरणनं शेतकऱ्यांकडून २२ हजार कोटी रुपये तर सरकारकडून सवलतीच्या माध्यमातून ८ हजार २२५ कोटी रुपये लाटल्याचं निष्पन्न झालंय. 
महावितरणकडून सुमारे ४ रुपये प्रति युनिट दराने वीज खरेदी केली जाते. तर शेतकऱ्यांना मूळ विक्री दरापेक्षा कमी दराने वीज पुरवली जाते. त्यापैकी शेतकऱ्यांना दीड रुपया मोजावा लागतो, तर उर्वरित रक्कम सरकार महावितरणला देते. मात्र, महावितरणनं शेतकऱ्यांच्या  प्रत्यक्ष वीज वापरापेक्षा जादा वीज वापर असल्याचं दाखवून शेतकऱ्यांची आणि सरकारची लूट केलीय. 

WebTitle ::  30 lakh crores scam for fraud of farmers

संबंधित बातम्या

Saam TV Live