आता देवगड नाही तर  "द आम सिटी"

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 सप्टेंबर 2018

हापूस आंब्यांमुळे देवगडचं नाव देशात नव्हे विदेशातही जाऊन पोहचलं..मात्र आता याच नावावरुन देवगडमध्ये राजयकीय पेच निर्माण झाले आहे.

देवगडला जी आय मानंकन मिळालं आणि देवगडचं द आम सिटी असं नामांतरही करण्यात आलं. देवगड जामसंडे नगरपंचायतीवर  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सत्ता असल्यानं आमदार नितेश राणेंच्या  पुढाकारातून देवगड शहराचे 'द आम सिटी' असं नामांतर झालं..मात्र महत्वाची बाब म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बैठकीत नामांतराचा ठराव न घेताचं हे नामांतर करण्यात आलं.

नामांतराची विशिष्ठ प्रक्रिया पार न पाडता. आमदार नितेश राणेंच्या हस्ते नामांतरीत फलकाचं अनावरणही आटपून घेतलं. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार नामांतराच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. 

ज्याप्रमाणं नागपूरची  मँगो सीटी म्हणबन ओळख आहे त्याचप्रमाणे नामांतर नव्हे तर नामविशेषण दिल्याची सारवासारव  नगराध्यक्षांनी केलीय..त्यामुऴे या हापूस आंब्याच्या शहरात नामांतरावरुन श्रेयवादाची लढाई चांगसीच पिकली आहे असं म्हणावं लागेल..
 
संबंधित बातम्या

Saam TV Live