देशात २४ तासांत ३३२० करोनाबाधित 

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 9 मे 2020

 गेल्या २४ तासांत देशात करोना ३३२० नवीन करोनाबाधित रुग्णांची भर तर ९५ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंयदेशव्यापी लॉकडाऊनच्या ४६ व्या दिवशीही करोना फैलाव काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही.

नवी दिल्ली :आरोग्य मंत्रालायाच्या शनिवारी सकाळच्या अपडेट आकडेवारीनुसार, देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५९ हजार ६६२ वर पोहचलीय. यातील, १९८१ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत तर १७ हजार ८४७ जण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत.देशातील वेगवेगळ्या रुग्णालयांत ३९ हजार ८३४ जणांवर उपचार सुरू आहेत. देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ५६ हजारांच्या पुढे गेलीय. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या २४ तासांत देशात करोना ३३२० नवीन करोनाबाधित रुग्णांची भर तर ९५ जणांचा मृत्यू झालेत. 

गुजरातमध्ये ७४०२ रुग्ण आढळले आहेत तर ४४९ जणांचा मृत्यू झाला आहे.यातील, महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच १९ हजार ०६३ रुग्ण आढळले आहेत तर ७३१ जणांचा मृत्यू झाला आहे. 

WebTittle ::  3320 crore in 24 hours in the country


  


संबंधित बातम्या

Saam TV Live