36 जिल्ह्यांच्या गावागावातील घडामोडी एका क्लिकवर..

सिध्दी सोनटक्के
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात काय घडतं आहे? प्रचारासाठी नेते काय काय फंडे आजमवत आहेत ? यासह 36 जिल्ह्यांमधील काय विशेष घडतंय पाहा..36 जिल्ह्यांच्या रिपोर्टमधून...

कर्जत: शरद पवारांपाठोपाठ त्यांचा नातू रोहित पवारांनीही घेतली भर पावसात सभा, कर्जतमधील कोरेगाव या ठिकाणी रोहित पवारांच्या नियोजित सभेवेळी पावसाची जबरदस्त बॅटिंग, रोहित पवारांची भाजप-सेना सरकारवर टीका

परळी: शरद आणि रोहित पवारांसोबत आता धनंजय मुंडेनीही केलं  भर पावसात भाषण, सभेलाही लोकांची तुफान गर्दी 

 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात काय घडतं आहे? प्रचारासाठी नेते काय काय फंडे आजमवत आहेत ? यासह 36 जिल्ह्यांमधील काय विशेष घडतंय पाहा..36 जिल्ह्यांच्या रिपोर्टमधून...

कर्जत: शरद पवारांपाठोपाठ त्यांचा नातू रोहित पवारांनीही घेतली भर पावसात सभा, कर्जतमधील कोरेगाव या ठिकाणी रोहित पवारांच्या नियोजित सभेवेळी पावसाची जबरदस्त बॅटिंग, रोहित पवारांची भाजप-सेना सरकारवर टीका

परळी: शरद आणि रोहित पवारांसोबत आता धनंजय मुंडेनीही केलं  भर पावसात भाषण, सभेलाही लोकांची तुफान गर्दी 

अहमदनगर: भाजपच्या 6 मंत्र्यांचा पराभव निश्चित, राम शिंदेंना हरवून रोहित पवार जिंकणार असं सुप्रिया सुळेंचा विश्वास... भाजपच्या अंतर्गत निवडणूक सर्व्हेनुसारच रोहित पवारच निवडून येणार असा निष्कर्ष 

औरंगाबाद: औऱंगाबादमध्ये शिवसेना आणि MIMमध्ये चांगलीच जुंपली.... औरंगाबादमध्ये हिरवा झेंडा की भगवा झेंडा? यावरुन उद्धव आणि औवेसींमध्ये वाकयुद्ध..  औऱंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंनी ओवैसींना ललकारलं...औरंगाबादेत पुन्हा एकदा धर्माच्या राजकारणाला सुरुवात 

मुंबई :सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने शिवसेनेमध्ये केला प्रवेश.. आदित्य ठाकरेंनी बांधले  शिवबंधन 

नांदेड: नांदेडमध्ये शिवसेनेच्या प्रचार रॅलीत अभिनेत्री अमिषा पटेलने लावली हजेरी ..नांदेड दक्षिण मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार राजर्षी पाटील आणि नांदेड उत्तर मतदार संघाचे बालाजी कल्याणकर यांच्या प्रचारार्थ अमिषा सहभागी 

मुंबई: वीर सावरकरांना भारतरत्न देण्यावरुन शिवसेनेने भाजपवर केली टीका,  भाजपने आपल्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणा ...  

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही, असे कौतुकोद्गार काढले..
आघाडीच्या काळात मुंबईची अवस्था कशी होती हे आठवा, असा सवालही मोदींनी केला..

बीड :उदयनराजे भोसले यांनी परळीतील सभेत विरोधकांना दिला इशारा ...आपल्या नेहमीच्या शैलीत कॉलर उडवत त्यांनी डायलॉगबाजी केली. 

बारामती :माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मी असे आम्ही तिघे त्रिशूळासारखे असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय...  

लातूर :लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार विनायक पाटील यांची प्रचारसभेत बोलताना जीभ घसरली... कमळाला मतदान केलं की कोणालाच नमाज पडायची गरज नाही .. असं विनायक पाटील यांनी म्हटलंय...  

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे...त्यामुळे सर्वच पक्षांनी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नाला सुरुवात केलीय...

ठाणे :ठाण्यामधल्या घोडबंदर रोड इथे एका घरातून 53 लाख 46 हजारांची रोकड जप्त, पुष्पांजली रेसिडन्समधील फ्लॅटमध्ये ही रोकड सापडली.. फ्लॅटचा मालक राजू खरे आणि आमदार रमेश कदम यांना याप्रकरणी अटक

धुळे: धुळयामधे शस्रं तसेच अवैध दारू व रोख रक्कम हस्तगत करण्यात आलीय.. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.. गुप्त माहितीनुसार जोयदा गावातील सुरसिंग पावरा यांच्या घरात पोलिसांनी टाकले छापे त्यावेळी अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला..

सोलापूर : विधानसभा निवडणुकीतील कामकाजासाठी STच्या 10 हजार 538 बस आरक्षित ...यात सोलापूर, पुणे आणि नाशिक विभागासाठी सर्वात जास्त आरक्षित बस , 20 आणि 21 ऑक्टोबर या दोन दिवशी प्रत्येकी 5 हजार एसटी निवडणुकीच्या कामात व्यस्त 

परभणी: परभणीच्या जिंतूर सेलू मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांनी चक्क वासुदेवांना प्रचारासाठी घेतलं  मदतीला . हे वासुदेव तब्बल दहा दिवसांपासून ग्रामीण भागात भाजपचा प्रचार करत असून त्याना चांगला प्रतिसाद मिळतोय...  

लातूर: सरकारने तात्काळ पावलं उचलून लातूरला उजनीचं पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी सुशीलकुमार शिंदेंनी केलीय... लातूर शहरात सध्या तीव्र पाणी टंचाई असून उजनी धरणाच्या पाण्याची मागणी जुनी आहे...

मुंबई :युवा नेता कन्हैय्या कुमार मुंब्र्यात आघाडीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी प्रचारात उतरलाय...यावेळी त्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला...आझादी गीत गात त्याने मतदारांना मतदान करण्याचं आवाहनही केलंय...

सातारा:.ईडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा  जोरदार हल्लाबोल .. ईडीला येडं करून टाकू शरद पवारांचा इशारा , ईडीचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी केला जातोय असंही पवार म्हणालेत. 

मुंबई प्रफुल्ल पटेल यांची काल तब्बल 12 तास ईडीकडून चौकशी . सकाळी 10 वाजता ईडी कार्यालयात गेलेले प्रफुल्ल पटेल हे थेट रात्री साडेदहा वाजता ईडी कार्यालयातून बाहेर पडले. कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतल्याचा  पटेल यांच्यावर  आरोप 

पुणे :मुंबई, पुण्यासह कोल्हापुरात आज पावसाचा इशारा . मुंबई, पुणे कोकण आणि कोल्हापुरात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज  दरम्यान, काल मुंबई, पुणे, ठाण्यासह नवी मुंबई आणि उपनगरांत पावसाचं हजेरी 

सोलापूर :परतीच्या पावसाने काल रात्री पुन्हा पंढरपूर आणि माढा तालुक्यातील गावांना झोडपलं..  सोलापूर जिल्हयात यावर्षी पाऊस कमी झाला.. परंतु परतीच्या पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळालाय.. 

सिंधुदुर्ग :सिंधुदुर्गात परतीच्या पावसाचा धुमाकूळ  वादळी वाऱ्यासह आणि मेघ  गर्जेनसह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू...  अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली...नांदगाव, कणकवली, कुडाळ, ओरोस, तरेळे या भागात मुसळधार पाऊस सुरू

वाशिम: वाशिमच्या मंगरुळपीरला परतीच्या पावसाने झोडपलं...पावसामुळे बाजार समितीत विक्रीला आलेलं सोयाबीनचं पीक भिजलं ...त्यामुळे बळीराजाचं मोठं नुकसान 

नवी मुंबई: गेल्या काही दिवसातील कांद्याची टंचाई लक्षात घेता मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी इजिप्तहून मागवला होता कांदा ...तो कांदा वाशीतील घाऊक बाजारात झाला दाखल.. 20 ते 22 रुपये किलो दराने हा कांदा विक्रीसाठी ठेवण्यात आलाय..

 मुंबई: मुंबईतील ९६% रस्ते खराब स्थितीत..   विशेष म्हणजे हे रस्ते कंत्रादाराने हमी दिलेल्या कालावधीपूर्वीच रस्त्यांची ही स्थिती झाली असल्याचे स्पष्ट...

मुंबई: रविवारी तीनही मार्गावर विविध कामांसाठी मेगाब्लॉक.. मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड ते माटुंगा सकाळी सव्वाअकरा ते पावणेचारपर्यंत ब्लॉक  हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर सकाळी साडेअकरा ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणारेय ...आणि पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दोन्ही धिम्या मार्गावर सकाळी साडेदहा ते साडेतीन वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणारेय...

मुंबई: पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू ,  आतापर्यंत पीएमसी बँकेच्या चौथ्या खातेदारांचा मृत्यू .उपचार करता न आल्यानं त्यांचा मृत्यू... 

अकोला :अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिक्षेच्या उत्तरपत्रिका चक्क इंटर्न डॉक्टरांकडून तपासून घेण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर...  हा प्रकार सुरु असताना संबंधित महिला प्राध्यापक डॉक्टर चक्क फोनवर व्यस्त असल्याचं निदर्शनास आलंय..

नवी मुंबई : नवी मुंबईच्या नेरुळजवळ कारला लागली आग...  आग नेमकी कशामुळे लागली त्याचं कारण अस्पष्ट 

नाशिक: मुंबई-नाशिक महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक लागली आग  टेम्पो ट्रॅव्हल्समधून धूर निघत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी ही गाडी थांबवली..आणि प्रवाशांना गाडीतून खाली उतरवलं....पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली

ठाणे: नाल्यात पडलेल्या गाईच्या वासराला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढलं...ठाण्याच्या शास्त्रीनगर परिसरातल्या नाल्यात हे वासरु पडलं ... त्याला काही केल्या बाहेर पडता येईना... अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी या वासराला शिताफीने बाहेर काढलं...

 


संबंधित बातम्या

Saam TV Live