संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठचा 37 वा दीक्षांत समारंभ

Sant Gadge Baba Amravati University.
Sant Gadge Baba Amravati University.

 २९ मे रोजी मुलांमध्ये अकोल्याचा तेजस तर मुलींमध्ये अमरावतीच्या सारिकाला सर्वाधिक सुवर्णपदक

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा Sant Gadge Baba Amravati University सदतिसावा दीक्षांत समारंभ Convocation Ceremony शनिवार, दि. 29 मे रोजी सकाळी 11.00 वाजता आभासी पद्धतीने संपन्न होत आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री भगत सिंह कोश्यारी भूषवनार आहे . 

हे देखिल पहा - 

तसेच भारत सरकारच्या रस्ते वाहतुक व परिवहन आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण करणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना.श्री. उदय सामंत हे विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करतील. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज विद्यापीठाची आभासी पद्धतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.

या दीक्षांत समारंभामध्ये देण्यात येणाऱ्या पदके / पारितोषिकांसाठी मुलांमध्ये सर्वाधिक सुवर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोलाचा तेजस दिनेश राठी याला सुवर्ण - 5, रौप्य - 1 व रोख पारितोषिक - 1 व मुलींमध्ये सर्वाधिक सुवर्ण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाची  कु. सारिका विष्णूपंत वनवे  या विद्यार्थीनीला सर्वाधिक सुवर्ण - 6 व रोख पारितोषिक - 1 घोषित झाले आहे.

या दीक्षांत समारंभात विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना 110 - सुवर्णपदके, 22 - रौप्यपदके व 22 - रोख पारितोषिके असे एकूण 154 पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.  02 सुवर्ण पदकांसाठी आणि 02 रोख पारितोषिकांसाठी कोणीही पात्र ठरले नाही. 83 विद्याथ्र्यांना पदके देवून गौरवान्वीत केले जाणार असून यामध्ये मुली- 65 तर मुले - 18 आहेत. विद्यापीठांतर्गत शिक्षक व संशोधक विद्यार्थी संशोधनाचे कार्य करीत असून आजपर्यंत 4475 संशोधकांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.  या दीक्षांत समारंभात विद्या शाखानिहाय 316 संशोधकांना आचार्य पदवी देवून सन्मानित करण्यात येत आहे.

Edited By - Puja Bonkile

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com