निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येणार!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पंढरपूर :  विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. काही आमदार थेट आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

विखे पाटील आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विखेंच्या या  गौप्यस्फोटोमुळे काँग्रेस  आणि राष्ट्रवादीमध्येच फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याचे समोर आले आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पंढरपुरातील एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी जाहीर सभेत काँग्रेसचे आमदार भारत भालके यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याचे आवाहन केले होते. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे काही आमदार देखील राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असल्याचे मुंडे म्हणाले होते.
मुंडेंच्या या विधानाविषयी विखे पाटील यांना विचारले असता, राष्ट्रवादीचेही काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगत त्यांनी मुंडेंवर पलटवार केला.

जनसंघर्ष यात्रेनंतरही धुळे आणि नगर  महानगरपालिका निवडणूकीत भाजप वरचढ ठरले आहे, असे विचारले असता,  सत्ताधारी भाजपने धनशक्तीबरोबरच पोलिसी बळाचा वापर करुन निव़डणूका जिंकल्या आहेत. भाजपने या निवडणुकीत अनेक गुंडांना राजाश्रय दिला आहे. आजपर्यंत जेवढा सत्तेचा दुरुपयोग कोणी केला नव्हता इतका दुरुपयोग भाजपने केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेला हल्ला समाजाच्या आरक्षणासाठी  असलेल्या तीव्र  भावना आहेत. मात्र अशा भ्याड हल्ल्याचे कोणीही  समर्थन करणार नाही. कायदेशीर लढाई लढणे गरजे असल्याचेही यावेळी विखे पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार भारत भालके, काँग्रेस  जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील( तुंगत) आदी उपस्थित होते. 

संबंधित बातम्या

Saam TV Live