वर्ध्यात नगरपालिका, पोलिस आणि  जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाहीत ४० दुकान सील 

सुरेंद्र रामटेके
मंगळवार, 4 मे 2021

वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे आकडे सातत्यान वाढत आहेत. पण बाजारात गर्दीही होताना दिसत आहे. अशा स्थितीत प्रशासनानं रस्त्यावर उतरून कारवाईची मोहीम हाती घेतली. या कार्यवाही नुसार वर्ध्यात आज सुमारे ४० दुकान सील करण्यात आली आहेत. 

वर्धा: वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे आकडे सातत्यान वाढत आहेत. पण बाजारात गर्दीही होताना दिसत आहे. अशा स्थितीत प्रशासनानं रस्त्यावर उतरून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या कार्यवाही नुसार वर्ध्यात आज सुमारे ४० दुकान सील करण्यात आली आहेत. 40 shops sealed in joint operation of municipality police and district administration

वर्ध्यात व्यावसायिक दुकानाचे अर्ध शटर उघडून व्यवसाय करत होते, तर कुणी पार्सल सेवा सुरु असताना ग्राहकांना आपल्या हॉटेलमध्ये बसू देत होते. सातत्यानं कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनानं आज बाजारपेठेत कारवाईची मोहीम राबवली. महसूल, नगर पालिका, पोलीस प्रशासनाच्या वतीन संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली आहे. लोकानी गांभीर्य न बालगल्यास अधिक कडक कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे. 

हे देखील पहा -

जीवनावश्यक सेवेत नसलेली दुकान सुद्धा उघडी असल्याचे यावेळी निदर्शनास आले. यावेळी सुमारे ४० दुकान सील करण्यात आली. अनेकांना दंडही आकारण्यात आला. नागरिकांनी यास सहकार्य करावे असे आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे. या कारवाईन दुकान सुरू ठेवणाऱ्यांना धडकी भरली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू राहील, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल आहे. 40 shops sealed in joint operation of municipality police and district administration 

बनावट कोरोना रिपोर्ट देणाऱ्या तरुणाला सांगली पोलिसांनी बेड्या ठोकल्या

कोरोना मूळ मृत्यू आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. अशात बाजारात होणारी गर्दी रुग्ण वाढीस कारणीभूत ठरू शकते. अशावेळी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करत नियम पाळण्याची गरज आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live