गेल्या  24 तासात  4213 नवे कोरोनाबाधित  

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 11 मे 2020

दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.

नवी दिल्ली -  देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 67152 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2206 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 44029 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 20917 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 4213 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 67152 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2206 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (11 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 4213 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 30 एप्रिल रोजी देशातील सर्व जिल्ह्यांची एक लिस्ट केली होती. यात 130 जिल्हे रेड, 284 ऑरेंज आणि 319 जिल्हे ग्रीन झोन करण्यात आले आहेत. मात्र गेल्या आठवड्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याने सरकारची चिंता आता आणखीच वाढली आहे. कारण ग्रीन झोनमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यान ते रेड झोन होऊ शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.  

 दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.  कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 41 लाखांवर गेली आहे. 

 पंजाबमध्येही अशीच परिस्थिती असल्याची माहिती मिळत आहे.  ज्या जिल्ह्यांना ग्रीन झोन घोषित केले गेले तेथे एका आठवड्यात संक्रमणाची नवीन प्रकरणं पाहायला मिळाली आहेत. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर ग्रीन झोन हे रेड झोन होऊ शकतात अशी शक्यता दिल्ली एम्सचे वरिष्ठ डॉक्टर आणि टास्क फोर्सच्या सदस्याने वर्तवली आहे. ग्रीन झोन असलेल्या 20 जिल्ह्यांमध्ये 9 दिवसांत संक्रमणाची 283 नवीन प्रकरणं दिसत आहेत. त्रिपुरातील ग्रीन झोन जिल्ह्यांमधून संक्रमणाची सर्वात जास्त प्रकरणे समोर आली आहे. त्यानंतर ओडिशातील कित्येक राज्यांमध्ये नवीन प्रकरणं मिळाली आहे.

WebTittle ::  4213 new corona in the last 24 hours


  


संबंधित बातम्या

Saam TV Live