धक्कादायक ! ऑनलाईन प्रेम प्रकरणाने घेतला ५ जणांचा जीव

5 killed in online love affair in Ahmednagar
5 killed in online love affair in Ahmednagar

अहमदनगर: एक धक्कादायक प्रकार अहमदनगरमधील Ahmednagar राहुरी येथे समोर आला आहे. राहुरी येथील एका आरोपीने एक हत्या केली. अनेक गोष्टी याबाबतचा खुलासा झाल्यानंतर समोर आल्या आहेत. यामध्ये आरोपीने एक नाही तर तब्बल ३ जणांचं खून केलं असल्याचं समोर आलं आहे. ज्ञानेश्वर ऊर्फ भैय्या गायकवाड संबंधित आरोपीचं नाव आहे. 5 killed in online love affair in Ahmednagar

ज्ञानेश्वर गायकवाड हा शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील मुळचा रहिवासी आहे. गावातील मुलींची छेड ज्ञानेश्वर हा काढत असल्याने घराच्यांनी वैतागून त्याला मामाकडे बीड तालुक्यातील शिरुर कासार येथे पाठविले होते. तेथे राहत असताना त्याची नाशिकच्या शीतल भामरे या विवाहितेशी सोशल मीडियाच्या माध्यमातू ओळख झाली. शितलला सध्या दोन मुले आहेत. या दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

तिचा संसार सोडून प्रेमात आंधळी झालेली शीतल ज्ञानेश्वरकडे म्हणजेच शिरुर येथे आली. यानंतर ते दोघे लिव्ह-ईन-रेलशनशिपमध्ये राहू लागले. मात्र यानंतर दोघांमध्ये सतत वाद होऊ लागला आणि यातूनच ज्ञानेश्वरने शीतलच्या डोक्यात दगड घालून तिला मारून टाकले. यानंतर पुन्हा ज्ञानेश्वरने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. तिच्यासाठी दागिने घेण्यासाठी एका सोनाराला आपल्या मित्राच्या मदतीने घरी बोलावून त्याची सुद्धा हत्या केली. 5 killed in online love affair in Ahmednagar

या दरम्यान, सोनाराचा खून केल्यानंतर ज्ञानेश्वरने मदत केलेल्या मित्राचा देखील खून केला. मरण पावलेल्या मित्राच्याआजोबांना आपल्या नातूच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने त्यांचा देखील मृत्यू झाला. ज्ञानेश्वरच्या मित्राच्या हत्ये प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर विचापूस दरम्यान हा   सर्व प्रकर समोर आला. यातून ज्ञानेश्वरच्या मामांनी सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे ज्ञानेश्वरमुळे एकूण 5 जणांनी जीव गमवला असून त्याला आता अटक करण्यात आली आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com