अजिदादांनी मुख्यमंत्र्यांचा शिवसेना पक्ष फोडला

साम टीव्ही
रविवार, 5 जुलै 2020
  • अजिदादांनी मुख्यमंत्र्यांचा शिवसेना पक्ष फोडला
  • पारनेरच्या 5 नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश 
  • भर पावसात मातोश्रीवर नाराजीचे ढग 

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येतानाच एक निर्धार करण्यात आला, तो म्हणजे एकमेकांचे लोकप्रतिनिधी न फोडण्याचा मात्र नगरमध्ये एक वेगळच चित्र पाहायला मिळालंय. इथं थेट अजितदादांनी शिवसेनेलाच खिंडार पाडलंय. 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचं मिळून राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. एकमेकांचे लोकप्रतिनिधी न फोडण्याचा निर्धार करणार्‍या या सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांचा पक्ष फोडल्यानं भर पावसात मातोश्रीवर नाराजीचे ढग दाटून आलेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आणि ते सुद्धा थेट बारामती पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वात नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. या प्रवेशामुळे शिवसेनेनं नाराजी व्यक्त केलीय. नगरमधील शिवसैनिकांनी या फोडाफोडीच्या राजकारणाचा निषेध केलाय. 

तर शिवसेना नगरसेवकांना अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीत यायचे होते. त्यांना आमच्या पक्षात घेतलं नसतं तर ते भाजपमध्ये गेले असते’, असं स्पष्टीकरण आमदार लंके यांनी दिलंय. 
 

पारनेर नगरपंचायतमधील फोडाफोडीमुळे शिवसेनेला धक्का बसलाय.  महविकास आघाडी सरकार सत्तेवर येत असताना फोडाफोडीचं राजकारण करणार्‍यांना धडा शिकवा असा इशारा अजित पवारांनी दिला होता. आता अजित पवार यांनी आपल्याच ‘धड्या’ला फाटा दिला की काय, अशी चर्चा सध्या नगरमध्ये सुरू आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live