"कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पत्रकारांना 50 लाखांचं विमा कवच"

साम टीव्ही
गुरुवार, 4 जून 2020

कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्यास पत्रकारांनाही  50 लाखाचं विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच  विरोधकांनी याकाळात राजकारण न करता कोरोना ला हरवण्यासाठी सोबत यावं, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलंय. बुलढाण्याच्या खामगावात कोविड केअर सेंटरच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

पत्रकारांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना 50 लाखाचं विमान कवच दिलं जाणारे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या काळातही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कर्तव्य पत्रकार दिवस रात्र पार पाडत आहेत. अशात त्यांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात आता कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्यास पत्रकारांनाही  50 लाखाचं विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच  विरोधकांनी याकाळात राजकारण न करता कोरोना ला हरवण्यासाठी सोबत यावं, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलंय. बुलढाण्याच्या खामगावात कोविड केअर सेंटरच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

मुंबईमध्ये बुधवारी १२७६ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ४३ हजार २६२ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १४१७ वर पोहचला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या मागील आठवडयापासून रुग्णांमध्ये सातात्याने वाढ होत असून, बुधवारी कोरोना रुग्ण संख्या ४३ हजार २६२ एवढी झाली आहे. मुंबईमध्ये बुधवारी ४९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ३६ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २७ पुरुष तर २२ महिलांचा समावेश आहे. 

देशातही गेल्या 24 तासांत तब्बल 9 हजारहून अधिक रुग्णांची भर पडलीये.  देशात काल एका दिवसात 9,304 रुग्णांचं निदान झालंय. एका दिवसात कोरोना रुग्णांची ही सर्वात जास्त रुग्ण संख्या आहे. या नव्या रुग्णांमुळे देशात कोरोना रुग्णांची 2 लाख 16 हजार 919 वर गेलीय. काल एकाच दिवसात देशात 260 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. देशात आतापर्यंत 6 हजार 75 लोकांचा कोरोनानं बळी घेतलाय. तर आतापर्यंत 1 लाख 6 हजार 737 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केलीय.   

दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वजण आपले कार्य पार पाडत आहेत. त्यामुळे त्यांची सुरक्षा सरकारची जबाबदारी आहे. त्याच अनुशंगाने, पत्रकारांना हे विमा कवच देण्याच आलंय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live