पुण्यात बस चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले 50 प्रवाशांचे प्राण

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 जानेवारी 2019

धायरी (पुणे) : पुण्यात बसचा ब्रेक फेल झाल्यानंतर ड्राइव्हरच्या प्रसंगावधान दाखविल्याने ५० प्रवाशांचे प्राण वाचले. हि घटना नऱ्हेमधील सेल्फी पॉइंट येथे घडली. आज सकाळी ७ : ४० वाजता नऱ्हेमधून शनिवार वाडा येथे निघालेल्य़ा बस (MH १२ FC ९४१३)चे ब्रेक फेल होवून रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर गेली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. 

सकाळी लवकर कामाला व कॉलेजला जाणाऱ्या प्रवाशांची बसमध्ये गर्दी होती. साधारण ५० प्रवासी ह्या बसमधून प्रवास करत होती. ब्रेक फेल झाल्याने ड्राइव्हरने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कठड्यावर घेतल्याने मोठा अनर्थ टळला. ड्राइव्हरने आरडाओरडा करत रस्त्याला असणाऱ्या बाकी वाहनांना बाजूला होण्याचे आवाहन केले. त्यात बसला हॉर्न ही नसल्याने पंचाईत झाली होती.  हा थरार घडल्यानंतर घाबरलेल्या काही प्रवाश्यांना धड बोलताही येत नव्हते.

Web Title: 50 passenger life saved due to bus drivers in Pune

संबंधित बातम्या

Saam TV Live