१ मे पासून राज्यातील 55 हजार स्वस्त धान्य दुकानदार संपावर  

संजय जाधव
सोमवार, 3 मे 2021

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी शासन दरबारी आवाज उठवून देखील शासनाने मागण्या मान्य न केल्याने राज्यातील 55 हजारावर  शासनमान्य स्वस्त धान्य दुकानदार संपावर गेल्याचे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आर.व्ही. अम्बुस्कार यांनी सांगितले.

 बुलढाणा  -  आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी शासन दरबारी आवाज उठवून देखील शासनाने मागण्या मान्य न केल्याने राज्यातील 55 हजारावर  शासन मान्य स्वस्त धान्य दुकानदार Shop संपावर On strike गेल्याचे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आर.व्ही. अम्बुस्कार यांनी सांगितले. 55,000 grain shopkeepers on strike 

राज्यात जवळपास 200 दुकानदारांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून सध्या राज्यात 3 हजार स्वस्त धान्य दुकानदार कोरोनाबाधित आहेत. कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत.

या कोरोनाबाधित दुकानदारांवर   विविध रुग्णालयात Hospital भर्ती असून उपचार घेत आहेत. सरकारने यासर्व बाबीकड़े दुर्लक्ष करत असून सर्व दुकानदारांना विमा कवच द्यावे , ई - पॉज मशीन मुळे कोरोना संसर्ग वाढता असून त्यावर पर्याय शोधावा अशा मागण्या दुकानदारांच्या आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारानी संप सुरु केलाय , मात्र लॉकडाउन मुळे आता सर्वसामान्या गरीबाना धान्य मिळविण्यासाठी त्रास होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

Edited By - Shivani Tichkule

 

संबंधित बातम्या

Saam TV Live