कोरोनावर लस शोधण्याचे हे 6 प्रयोग अंतिम टप्प्यात

साम टीव्ही
शुक्रवार, 8 मे 2020

कोरोनावर मात करणं लवकरच शक्य होणारंय. जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातील 6 प्रयोग हे अंतिम टप्प्यात आहेत. हे प्रयोग यशस्वी झाले तर कोरोनाविरूद्धची लढाई जिंकण्याचा मार्ग, सोपा होईल.

कोरोनावर मात करणं लवकरच शक्य होणारंय. जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातील 6 प्रयोग हे अंतिम टप्प्यात आहेत. हे प्रयोग यशस्वी झाले तर कोरोनाविरूद्धची लढाई जिंकण्याचा मार्ग, सोपा होईल..

कोरोना विषाणूनं साऱ्या जगाच्या नाकीनऊ आणले आहेत. पण त्याचबरोबर कोरोनावर मात करण्यासाठी शर्थीचे प्रयत्नही सुरू आहेत. कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील संशोधकांच्या 90 टीम अहोरात्र मेहनत घेतायेत. यातील 6 संशोधन आपलं लक्ष्य गाठण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत.  
 

1-AD5-nCoV लस

चिनी कंपनी कॅसिनो बायोलॅजिक्सनं 16 मार्चपासून या लसीचं परीक्षण सुरू केलंय. या संशोधनानुसार माणसाच्या शरीरात एडेनो-व्हायरस सोडलं जाईल. हा व्हायरस कोशिकांच्या प्रोटीनना सक्रिय करेल त्यामुळे कोरोना व्हायरसविरूद्ध लढणं सोप्पं जाईल. 

2- LV-SMENP-DC लस

चीनच्या शिंजेंन इंस्टीट्यूटनं ही एक लस तयार केलीय. ही लस HIVला कारणीभूत असलेल्या 
लेंटीवायरस वर आधारित आहे. ही लस रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कोरोना व्हायरसवर मात करेल. 

3-. वुहानमध्ये तयार होतीय लस

चीनच्या वुहान स्थित बायोलॉजिकल प्रोडक्ट्स इंस्टीट्यूट मध्ये बनवली जाणारी लस कोरोनाला नष्ट  करेल असा दावा केला जातोय. ही लस कोरोनाच्या जिन्समध्ये बदल करेल त्यामुळे संक्रमणाचा धोका टळेल असा दावा संशोधकांनी केलाय. 

4-ChAdOx1 लस

ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीमध्ये ही लस तयार केली जात असून 23 एप्रिलपासून ही लस तयार करण्याची मोहिम हाती घेण्यात आलीय. ही लस कोरोनावर मात करेल असा विश्वास ऑक्सफर्डच्या संशोधकांनी व्यक्त केलाय. 

5-mRNA-1273 लस

अमेरिकेच्या मैसाच्युसेट्स मधील बायोटेक्नोलॉजी कंपनी मॉडर्न थेराप्यूटिक्सनं ही लस तयार करतीय. ही लस माणसाच्या शरीरात निष्क्रिय व्हायरस निर्माण करेल. त्यामुळे माणसाची रोगप्रतिकारक सक्ती वाढेल असा दावा केला जातोय. 

6-INO-4800 लस

अमेरिकेतील फार्मा कंपनी इनोवियो मार्फत ही लस तयार केली जातीय. ज्यात प्लाज्मिडन रूग्णाच्या शरीरातील कोशिकांमध्ये डीएनए इंजेक्ट केलं जाईल. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोरोनावर मात करणं सोप्प जाईल. 

फायनल व्हीओ - कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात संशोधकांच्या प्रयत्नांना यश मिळेलही. पण त्याहून एक मोठं आव्हान असेल ते म्हणजे या औषधांचं उप्तादन आणि जगभरात त्याचा मुबलक पुरवठा करणं...


संबंधित बातम्या

Saam TV Live