असा कसा हा निष्काळजीपणा ! लोक वेळेत न पोहचल्याने तब्बल 6 हजार डोस गेले वाया

vaccine
vaccine

गोंदिया - कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. कोरोनाने Corona शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर थैमान घातल्याने, सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे.  महाराष्ट्रात Maharashtra तर कोरोनाने कहर केला असून उपचारा अभावी अनेक लोकांचा मृत्यू Death होत आहे. या कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी टाळेबंदी Curfew सह लसीकरण Vaccination हाच एकमेव पर्याय असल्याने आता ग्रामीण भागात लसीकरण करण्यासाठी नागरिकांना कसे प्रोत्साहित करावे व कसे कोरोनाला रोखावे असा प्रश्न जिल्हा प्रशासना समोर पडला आहे.  6000 doses were wasted as people did not arrive on time

गोंदियात Gondia लसीकरणासाठी लोक वेळेत न पोहचल्याने तब्बल 6 हजार डोस गेले वाया wasted गेले आहे. नोंदणी करुन नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकिकडे राज्यात लसीचा Vaccine तुटवडा असताना गोंदियात लस वाया जात असल्याचे चित्र सोमर आले आहे. ग्रामीण भागात असे सर्वाधिक प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.

हे देखील पहा -

ऐकिकडे राज्यात कोरोणा प्रतिबधात्मक लसीचा तुटवडा असताना  गोंदियात मात्र  लसीकरणासाठी नागरिक वेळेत न पोहचल्याने आतापर्यंत तब्बल 6057 डोस वाया गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये अद्यापही लसीकरणाबाबत गैरसमज असल्याने ते लसीकरणासाठी केंद्रावर पोहचत नसल्याचे चित्र समोर येत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात लसींचे डोस वाया जात आहेत,जिल्ह्यात आतापर्यंत 6057 डोस वाया गेले आहे. 6000 doses were wasted as people did not arrive on time

यात काेव्हीशिल्डचे Covishiled 2741 व कोव्हॅक्सिनचे Covaccine 3300 डोस वाया गेले आहे. हे डोस वाया गेले नसते तर एका गावातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असते. सध्या सर्वत्र लसींचा तुटवडा आहे आणि अशात मोठ्या प्रमाणात डोस वाया जात असल्याचे बिकट चित्र आहे त्यामुळे आता ग्रामीण भागात लसीकरण करण्यासाठी नागरिकांना कसे प्रोत्साहित करावे व कसे कोरोनाला रोखावे असा प्रश्न जिल्हा प्रशासना समोर पडला आहे.    

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com