COVID-19 Maharashtra: मागच्या 24 तासात 601 रुग्णांचा मृत्यू

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 26 मे 2021

मागच्या 24 तासात राज्यात 24,136 रुग्ण आढळले आहेत.

देशात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मागच्या 10 दिवसात 2 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव रुग्ण कमी झाले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील मागच्या काही दिवसात रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते. परंतु आता तो आकडा खूपच कमी झालेला दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये लागू असलेला लॉकडाऊन कोरोनाची आकडेवारी कमी करण्यास मदत करत आहे. राज्यात सध्या 1 जून पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. (601 patients died in the last 24 hours due to covid-19)

मागच्या 24 तासात राज्यात 24,136 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर, 36,176 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 56,26,155 रुग्ण आढळले असून 52,18,768 रुग्णांनी कोरोनावरती यशस्वी मात केली आहे. मागच्या 24 तासात राज्यात 601 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत देशात 90,349 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 3,14,368 अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. 3,35,41,565 नागरिकांची आतापर्यंत कोरोनाची चाचणी करण्यात आलेली आहे.

हे देखील पाहा

दरम्यान, राज्यात कोरोनानंतर बुरशीच्या आजाराने डोके वर काढले आहे. महाराष्ट्र सरकारने ( Maharashtra Government) काळ्या बुरशीला (Black Fungus) महामारी म्हणून घोषित केले आहे. त्याचबरोबर, कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सरकार आतापासून तयारीला लागले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. तिसरी लाट रोखण्यासाठी टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यानी बैठक देखील घेतली आहे.   


संबंधित बातम्या

Saam TV Live